मुंबई । भारतीय कर्णधार विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो सुरुवातीपासूनच इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) एकाच संघाकडून खेळत आहे. 2008 मध्ये वयाच्या 20व्या वर्षापासूनच तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) बरोबर सतत आहे. विराट असेही म्हणतो की, तो कधीही आरसीबीची संघ सोडणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. असे असूनही, विराटअद्याप आपल्या संघाला विजेतेपद जिंकून देऊ शकलेला नाही.
यावर्षी कोरोना विषाणूच्या साथीमुळे, आयपीएलचा 13 वा हंगाम युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय बायो- बबलमध्ये खेळली जाणार आहे. अनेक महिन्यांनंतर खेळाडू मैदानात उतरत आहेत.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीनेही जवळपास पाच महिन्यांनंतर फलंदाजी केली. अशा परिस्थितीत तो म्हणाला की, सुरुवातीला तो थोडा घाबरलेला आणि चिंताग्रस्त होता. पण आता विराटचे शॉट्स पाहून तो पुन्हा आपल्या रंगात परतल्याचे दिसते.
खरं तर, 2009, 2011 आणि 2016 मध्ये विराटचा आरसीबी संघ आयपीेएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु जेतेपदाऐवजी त्याला बाँड मिळाला, ज्यानुसार तो इतर कोणत्याही संघात जाऊ शकला नाही.
नुकताच आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विराट म्हणाला, “12 वर्षांचा हा प्रवास विलक्षण आहे. आपल्या सर्वांना आयपीएलचे जेतेपद जिंकावे असे वाटते. आम्ही त्याच्या जवळ तीन वेळा पोहोचलो, पण ते साध्य करू शकलो नाही. हे आपल्या सर्वांचे एक स्वप्न आहे. हंगाम चांगला असो किंवा वाईट आपण भावनिक होता. मी जोपर्यंत आयपीएल खेळत राहील तोपर्यंत मी आरसीबी संघ सोडणार नाही.”
https://www.youtube.com/watch?v=WgXRB6Bzgoc&feature=youtu.be
आयपीएलच्या 12 व्या हंगामात विराटने 14 सामन्यांत 33.14 च्या सरासरीने 464 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये त्याने 177 सामन्यात 37.84 च्या सरासरीने 5412 धावा केल्या आहेत. विराटने आयपीएलमध्ये 5 शतके आणि 36 अर्धशतके झळकावली आहेत. यावर्षी विराट कोहली व सर्व खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आरसीबीला असेल.
आरसीबीचा संघ-
विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, देवदत्त पड्डिकल, पार्थिव पटेल, ऍरॉन फिंच, जोशुआ फिलिप, शहबाज अहमद, गुरुकीरत सिंह मान, पवन देशपांडे, मोईन अली, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, इसुरु उडाना, युझवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, एडम जॅम्पा, डेल स्टेन.
महत्त्वाच्या बातम्या-
-२ कोटी असो नाहीतर २० कोटी, भारतीय क्रिकेटरला कुंटूंबीय आयपीएलपेक्षा अधिक प्रिय
-फॅन्सच सोडा, १००-१०० मॅच खेळलेले क्रिकेटरच झाले धोनी फॅन, पहा व्हिडीओ
-शेर तो शेरच! कोरोनातही धोनीला आजही पहाण्यासाठी दुबईत चाहत्यांची गर्दी, पहा व्हिडीओ
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स
-वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा प्रज्ञान ओझा
-आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग