भारतीय संघापुढे विश्वचषक 2023 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात बांगलादेशचे आव्हान आहे. सलग 3 विजयांनंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा सलग चौथा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात भारतीय संघाची मदार पुन्हा एकदा अनुभवी विराट कोहली याच्यावर असेल. पुण्यातील एमसीए स्टेडियम वरील विराटची आत्तापर्यंतची कामगिरी पाहिल्यास तो पुन्हा एकदा भारताच्या विजयात मोठे योगदान देऊ शकतो.
भारत विरुद्ध बांगलादेश संघात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 17वा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येथे खेळला जाणार आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. या खेळपट्टीवरील विराट कोहली याची आतापर्यंतची कामगिरी पाहता तो पुन्हा एकदा मोठी खेळी साकार करण्याची शक्यता आहे.
विराटने या मैदानावर आत्तापर्यंत 7 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 66, 122, 29, 107, 56, 66 व 7 अशा धावा काढल्या आहेत. या मैदानावरील त्याची सरासरी 64 तर स्ट्राइक रेट 92 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा या मैदानावर धुमाकूळ घालताना दिसू शकतो. याव्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याच्या नावे याच मैदानावर 254 धावांची सर्वोच्च खेळी जमा झालेली.
विराट सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातही चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांनी 85 धावांची खेळी केली होती. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 55 व पाकिस्तान विरुद्ध 16 धावा त्याने केल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात तो शतक झळकावण्याचा प्रयत्न करेल.
(Virat Kohli Extraordinary Stats In Pune In ODI)
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
हेही वाचा-
BREAKING: रोहित शर्मावर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई, मुंबई-पुणे हायवेवर हिटमॅनच्या लॅम्बोर्गिनीचा थरार