ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सीरिज मंगळवारी (१९ जानेवारी) संपली आहे. अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने मात करत भारतीय संघाने २-१ च्या फरकाने ही कसोटी मालिका खिशात घातली आहे. या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने बुधवारी (२० जानेवारी) जागतिक कसोटी फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली याला मोठे नुकसान झाले आहे. तर प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे याचीही घसरण झाली आहे.
पहिल्यांदाच विराट टॉप-३ मधून बाहेर
आयसीसीने जाहीर केलेल्या फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत विराटची तिसऱ्या स्थानावरुन चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील केवळ पहिला सामना खेळला होता. या सामन्यातील पहिल्या त्याने ७४ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात अवघ्या ४ धावांवर पॅट कमिन्सने कॅमरॉन ग्रीनच्या हातून त्याला झेलबाद केले होते. त्यानंतर पालकत्त्व रजेमुळे तो मायदेशात परतला. यामुळे त्याने पुढील ३ कसोटी सामने खेळले नाहीत. याच कारणामुळे विराटची घसरण झाली असावी.
विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांपासून विराट फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या ३ स्थानांवर विराजमान राहिला आहे. परंतु यंदा पहिल्यांदाच तो टॉप-३ मधून बाहेर पडला आहे.
मार्नस लॅब्यूशाने टॉप-३ मध्ये सहभागी
ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मार्नस लॅब्यूशाने याने कसोटी मालिकेतील प्रदर्शनाच्या जोरावर एका स्थानाची प्रगती केली आहे. ८७८ गुणांसह त्याने विराटच्या तिसऱ्या स्थानावर ताबा मिळवला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर कायम आहेत.
जो रुटची मोठी भरारी
याशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रुट याला श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील द्विशतकामुळे तब्बल ६ स्थानांचा फायदा आहे. त्याने अकराव्या स्थानावरुन थेट पाचव्या स्थानी मोठी उडी घेतली आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझाम ७८१ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ चेतेश्वर पुजारा याला कसोटी मालिकेतील दमदार फलंदाजीचा फायदा झाला आहे. त्याने एका स्थानाची प्रगती करत सातव्या स्थानी झेप घेतली आहे.
↗️ Labuschagne moves to No.3
↗️ Root enters top five
↗️ Pujara moves up one spot to No.7The latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting are out!
Full rankings: https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/49DbXmXznS
— ICC (@ICC) January 20, 2021
अजिंक्य रहाणेची घसरण
तसेच रुटचा संघसहकारी बेन स्टोक्स २ स्थानांनी घसरत आठव्या स्थानावर आला आहे. याव्यतिरिक्त विराटबरोबर भारतीय कसोटीपटू रहाणे याचेही नुकसान झाले आहे. रहाणेची कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यातील फलंदाजी सुमार राहिली. त्यामुळे त्याची दोन स्थानांनी घसरण झाली असून ७४८ गुणांसह तो नवव्या स्थानावर आला आहे. शिवाय न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्स दहाव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…अन् ऑस्ट्रेलियन कोच लँगर भारतीयांबद्दल असे काही बोलले, की व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
टीम इंडियाच्या विजयाने गुगल बाबाही खुश! ऑनलाईन फटाके फोडत क्रिकेटप्रेमींना मोठं सरप्राईज
वंदे मातरम! ब्रिस्बेन कसोटी विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ फॅनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल