भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांच्या म्हणण्याप्रमाणे विराट कोहलीला मोठी खेळी करण्यासाठी त्याने पहिल्या वीस धावा करणे महत्त्वाचे आहे.
भारत इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला आज बुधवारपासून (१ऑगस्ट) बर्मिंघहमच्या एजबेस्टने मैदानावर सुरवात होत आहे त्या पार्श्वभूमिवर राजपूत बोलत होते.
“विराट खूपच आक्रमक आहे आणि त्याला आघाडीवर राहून संघाचे नेतृत्व करलायला आवडते. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात त्याची कामगिरी खूपच निराशाजन झाली होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष आता त्याच्या कामगिरीकडे लागले आहे.” असे लालचंद राजपूत म्हणाले.
“कोहलीने त्याच्या फलंदाजीतील त्रुटी कमी करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. तो सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे विराट या मालिकेच्या सुरवातीलाच मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी त्याला सुरवातीच्या २० धावा करने महत्त्वाचे असेल. जर त्याने सुरवातील २० धावा केल्या तर तो मागे वळून पाहणार नाही.” असे लालचंद राजपूत म्हणाले.
त्याचबरोबर पुढे राजपूत यांनी भारताने तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांचा अंतिम ११ खेळडूंचा संघात समावेश करावा असे मत व्यक्त केले.
इंग्लंड विरुद्ध भारत पहिला कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर होणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २१ हजार धावा करणारा खेळाडूच झालाय मुलाचा कोच