Loading...

टाॅप ५- इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत होणार हे ५ खास विक्रम

१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे.

या मालिकेतील बर्मिंघहम येथील एजबेस्टन मैदानावर होणारा पहिला सामना इंग्लंड क्रिकेट संघाचा १००० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असणार आहे.

या सामन्याची जोरदार चर्चा सध्या सगळीकडेच होताना दिसत आहे. अशा या दौऱ्यातील कसोटी मालिकेत अनेक विक्रम होऊ शकतात. ते असे

१. विराट कोहलीला इंग्लंडविरुद्ध १ हजार धावा करण्यासाठी केवळ २३ धावांची गरज. त्याने हा कारनामा केला तर अशी कामागिरी करणारा तो १३वा भारतीय बनेल. भारतीय खेळाडूंमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (२५३५) केल्या आहेत.

२. कसोटी कारकिर्दीत ४ हजार धावा करण्यासाठी मुरली विजयला ९३ धावांची गरज. त्याने ५७ सामन्यात ४०.६९ सरासरीने ३९०७ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा १६वा भारतीय खेळाडू बनण्याची विजयला संधी आहे.

Loading...

३. कसोटी कारकिर्दीत ३ हजार धावा करण्यासाठी अजिंक्य रहाणेला १०७ धावांची गरज. त्याने ४५ सामन्यात ४३.१७च्या सरासरीने २८९३ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा २२वा भारतीय खेळाडू बनण्याची रहाणेला संधी आहे.

४. इंग्लंडविरुद्ध ५० कसोटी विकेट्स घेणारा ६वा भारतीय बनण्यासाठी आर अश्विनला ५ विकेट्सची गरज. त्याने ११ सामन्यात ३७.४४च्या सरासरीने ४५ विकेट्स घेतल्या आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत अनेक भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यात भागवत चंद्रशेखर यांनी २३ सामन्यात ९५ विके्टस घेतल्या आहेत.

ज्या गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध ५०पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत त्यात विनु मंकड यांची सरासरी सर्वोत्तम अर्थात २३.१२ आहे.

Loading...

५. कसोटीत इंग्लंडकडून ६ हजार धावा करणारा १५वा फलंदाज होण्यासाठी जो रुटला ४० धावांची गरज. त्याने ६९ सामन्यात ५९६० धावा केल्या आहेत.

६. वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडला कसोटीत ३ हजार धावा करण्यासाठी केवळ २४ धावांची गरज. त्याने ११८ सामन्यात १९.९७च्या सरासरीने २९७६ धावा केल्या आहेत.

७. भारताविरुद्ध कसोटीत १०० विकेट्स घेण्यासाठी जेम्स अॅंजरसनला १४ विकेट्सची गरज. त्याने भारताविरुद्ध २२ कसोटीत ८६ विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध कसोटीत मुथय्या मुरलीधरनने १०५ तर इम्रान खानने ९४ विकेट्स घेतल्या आहेत.

८. कसोटीत ३००० धावा आणि ४०० विकेट्स घेणारा पाचवा आॅलराऊंडर होण्यासाठी ब्राॅडला २६ धावांची गरज. यापुर्वी कपिल देव, रिचर्ड हॅडली, शेन वार्न आणि शाॅन पाॅलोकने हा कारनामा केला आहे.

Loading...

९. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज होण्यासाठी जेम्स अॅंडरसनला २४ विकेट्सची गरज. त्याने १३८ सामन्यात ५४० विकेट्स घेतल्या आहेत. तर सध्या हा विक्रम नावावर असलेल्या ग्लेन मॅकॅग्राने १२४ सामन्यात ५६३ विकेट्स घेतल्या आहेत.

१०. या मालिकेत जेम्स अॅंडरसनने जर २४ विकेट्स घेतल्या तर तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुथय्या मुरलीधरन (८००), शेन वार्न (७०८) आणि अनिल कुंबळे (६१९) नंतर चौथ्या स्थानी येईल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आम्ही या मैदानावर किंग आहोत, टीम इंडियाने पराभूत कण्याचा विचारही करु नये

Loading...

अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी

मांजरेकर आज विराटला सल्ला देतायं, उद्या फेडररला देतील

You might also like
Loading...