फोर्ब्स इंडियाने 2019ची ‘सेलिब्रिटी 100 जणांची यादी’ जाहीर केली. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान फोर्ब्सने त्याची एकूण कमाई 252.72 कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे.
गेल्या आठ वर्षांच्या इतिहासात या यादीत प्रथमच असा आहे जेव्हा एखादा खेळाडू शीर्षस्थानी आला आहे. याआधी येथे फक्त बॉलिवूड स्टार्सचे वर्चस्व राहिले होते.
सलमान खानने तीन वेळा अव्वल स्थान पटकावले होते, यावेळी तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत विराट गतवर्षी दुसर्या क्रमांकावर होता तर 2017 मध्ये तिसर्या क्रमांकावर होता.
कोहलीच्या कमाईचे मुख्य स्त्रोत म्हणून फोर्ब्स इंडियाने सामना शुल्क, बीसीसीआयचा वार्षिक करार, ब्रँड अॅन्डॉरसमेंट आणि प्रायोजित इन्स्टाग्राम पोस्ट यांचा विचार केला असल्याचे सांगितल्या आहेत.
फोर्ब्सच्या या यादीत बॉलिवूड स्टार अक्षय कुमार 293.25 कोटींच्या कमाईसह दुसर्या क्रमांकावर आहे. विशेष गोष्ट अशी आहे की त्याची वार्षिक कमाई विराटपेक्षा जास्त सांगितली गेली होती, परंतु तरीही त्याला दुसरे स्थान देण्यात आले.
फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, ‘सेलिब्रिटी क्रमवारी त्यांच्या अंदाजे उत्पन्न आणि प्रिंट आणि सोशल मीडियाच्या आवाक्यात असलेल्या त्यांच्या लोकप्रियतेच्या सरासरीच्या आधारे मोजले गेले आहेत. अशा परिस्थितीत, काही सेलिब्रेटी ज्यांची कमाई कमी आहे आणि लोकप्रियता खूप जास्त आहे, त्यांना जास्त उत्पन्न असणार्या परंतु कमी लोकप्रिय असलेल्या सेलिब्रिटींपेक्षा वरचे स्थान देण्यात आले आहे.
धोनी पाचव्या तर सचिन नवव्या क्रमांकावर
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांनीही या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे. एमएस धोनीला 135.93 कोटी रुपये कमाईसह पाचव्या स्थानावर, तर सचिन 76.93 कोटींच्या कमाईसह नवव्या क्रमांकावर आहे.
फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार 2013 साली निवृत्त झाल्यानंतरही सचिन दरवर्षी पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवत आहे.
रोहित शर्मा 11व्या आहे. या यादीत रिषभ पंत (30व्या), हार्दिक पांड्या (31व्या), जसप्रीत बुमराह (33व्या), केएल राहुल ( 34 व्या), शिखर धवन ( 35व्या), रवींद्र जडेजा (51व्या) आणि कुलदीप यादव (61व्या) या पुरुष क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे.
मिताली राज (88व्या), स्मृती मंधाना (90व्या) आणि महिला क्रिकेट संघातील हरमनप्रीत कौर (91 व्या) यांनीही या यादीमध्ये स्थान मिळविले आहे .
इतर खेळांमधील स्टार शटलर पीव्ही सिंधू ( 63व्या) आणि सायना नेहवाल (81व्या), फुटबॉलपटू सुनील छेत्री (85 वे), बॉक्सर मेरी कोम ( 87व्या), गोल्फर अनिर्बान लाहिरी ( 95व्या), कुस्तीपटू बजरंग पुनिया (94 व्या) आणि टेनिसपटू रोहन बोपन्ना (98व्या) यांना देखील या यादीमध्ये स्थान मिळविण्यात यश आले आहे.
गोष्टी लपून रहात नाही! कोहलीचं देतो वयस्कर खेळाडूंना सर्वाधिक संधी
वाचा👉https://t.co/qg79VHYMfA👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #INDvWI— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
वाढते वय ही समस्या नाही, केकेआरने काहीतरी पाहिले म्हणूनच मला खरेदी केले – प्रविण तांबे
वाचा- 👉https://t.co/iZvvfkM82R👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #IPL2020Auction
— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019