टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फ्लॉप झाला आहे. गाबा कसोटीच्या पहिल्या डावात त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराट अत्यंत खराब शॉट खेळून बाद झाला.
या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघानं तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत केवळ 22 धावांत 3 विकेट गमावल्या. एका टोकावर सलामीवीर केएल राहुल जम बसवून आहे. मात्र दुसऱ्या टोकावरून भारताची पडझड झाली.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 445 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी भारतीय सलामीवीरांवर होती, पण तसं झालं नाही. यशस्वी जयस्वाल केवळ 4 धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कनं त्याची विकेट घेतली. जयस्वालनं स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला होता. पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो अतिशय खराब शॉट खेळून बाद झाला. त्यानं चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, जो थेट मिचेल मार्शच्या हातात गेला.
तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुबमन गिल केवळ एक धाव करून बाद झाला. गिलनंही स्टार्कच्या चेंडूवर खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्यानं बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बॅट मारली, ज्याची अजिबात गरज नव्हती. मिचेल मार्शने स्लिपमध्ये त्याचा जबरदस्त झेल घेतला.
टीम इंडियानं एकापाठोपाठ दोन विकेट गमावल्यानंतर विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु त्यानं देखील पुन्हा एकदा निराशा केली. कोहली 16 चेंडूत केवळ 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा जुना कमकुवतपणा पुन्हा एकदा समोर आला. विराटनं जोश हेझलवूडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आपली बॅट मारली आणि तो विकेटच्या मागे झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. मिचेल स्टार्कनं 2 आणि जोश हेझलवूडने एक विकेट घेतली.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहबाबत वादग्रस्त वक्तव्य, इंग्लिश कमेंटेटरनं मागितली माफी; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
IND vs AUS; भारतीय गोलंदाज कुठे कमी पडले? गोलंदाजी प्रशिक्षकाने केला खुलासा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिब अल हसनवर घातली बंदी, नेमकं प्रकरण काय?