पुणे । भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपण क्रिकेट खेळणं कधी बंद करणार आहे हे स्पष्ट सांगितले आहे. गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पिअन्स या कार्यक्रमात त्याने याबद्दल खुलासा केला आहे.
विराट म्हणतो, ” मला असं वाटत की सकाळी मी जेव्हा ध्येय घेऊन, एक लक्ष घेऊन झोपेतून उठतो तोपर्यंत मी क्रिकेट खेळणार आहे. ज्यादिवशी माझी आवड (पॅशन) संपेल तेव्हा सगळं संपेल. ”
“माझं शरीर जोपर्यंत साथ देत आहे तोपर्यंतच मी क्रिकेट खेळणार आहे. ज्यादिवशी माझ्यातील ऊर्जा, आवड क्रिकेट खेळायची संपेल, मला असं वाटेल की माझ्यात जिंकण्याची ईर्षा आता राहिली नाही तेव्हा मी खेळूच शकत नाही.”
“जर मी तेव्हाही तसच करत राहिलो तर त्याचा अर्थ असा होईल की मी उगीच भाग घ्यायचा आहे म्हणून खेळत आहे. उगीच कस खेळावं माहित आहे म्हणून खेळत आहे. जर मी संघासाठी काही देऊ शकत नसेल तर मला खेळण्यात काहीही रस नाही. ”
Link: https://t.co/kTcqKsxnr7
— Gaurav Kapur (@gauravkapur) November 3, 2017
“इंग्लंडमध्ये माझी खराब वेळ आली होती. माझ्यासाठी सर्व सामने ही एक जबाबदारी आहे. मला कुणालाही काहीही सध्या करून दाखवायचं नाही. मला सामने जिंकून द्यायचे आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं करायच आहे. फलंदाजी चांगली करायची आहे. ” विराट पुढे म्हणाला.
गौरव कपूरचा हा कार्यक्रम काल त्याच्या युट्युबवरून पोस्ट करण्यात आला आहे.