---Advertisement---

विराटचं असं वागणं बरं नव्हं! आता या व्यक्तीवर काढला पराभवाचा राग

---Advertisement---

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध वनडेपाठोपाठ कसोटी मालिका 0-2ने गमवली. यामुळे टीम इंडियावर चौफेर टीका होत आहे. अशा परिस्थीतीतही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मात्र कोणत्याही प्रकारची चुक मानायला तयार नाही.

दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट एका पत्रकारावर चांगलाच भडकलेला दिसला. त्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर विराटने फारच रागात उत्तर दिले.

झाले असे की, काल विराटने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन बाद झाल्यावर जोरदार सेलिब्रेशन केले. त्याने प्रेक्षकांकडे पाहुन तोंडावर बोट ठेवत सर्वांना शांत बसा असाच काहीसा हावभाव केला.

यावर त्या पत्रकाराने विराटला विचारले, “तुला कालच्या तुझ्या वागण्यावर काय बोलायचं आहे? तु लोकांकडे पाहुन हावभाव केले. भारतीय कर्णधार म्हणून तु एक चांगले उदाहरण क्रिकेट जगताला देऊ शकत होतास. ”

यावर भडकलेला विराट त्या पत्रकाराला म्हणाला, “तुम्हाला काय वाटते? तुमचं यावर काय उत्तर आहे?”

पत्रकाराने पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर मात्र कोहली चांगलाच भडकला. ” नक्की काय घडलं आहे याची तुम्ही पहिली माहिती घ्या. आणि मग चांगले प्रश्न घेऊन या. तुम्ही अर्धवट प्रश्न आणि अर्धवट माहिती घेऊन प्रश्न विचारु शकत नाही. आणि जर तुम्हाला वाद निर्माण करायचे असतील तर त्यासाठी ही योग्य जागा नाही. मी सामनाधिकाऱ्यांशी बोललो आहे. त्यांना याबद्दल काहीही शंका नाही. ” असे विराट यावेळी म्हणाला.

https://twitter.com/ESPNcricinfo/status/1234393204692148224

https://twitter.com/imtheguy007/status/1233980891061522433

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---