कानपुर । येथील ग्रीन प्रक मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील निर्णायक सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा बरोबरच विराट कोहलीनेही कारकिर्दीतील ४६ वे अर्धशतक पूर्ण केले आहे.
या दोघांनी मिळवून भारताचा स्कोर १०० पार नेला आहे. या दोघांनी आतापर्यंत १३६ धावांची भागीदारी केली आहे.
पहिल्या वनडे सामन्यात शतक केल्यानंतर विराट कोहलीला पुण्यातील वनडे सामन्यात चांगल्या सुरुवाती नंतरही मोठी खेळी करता आली नव्हती. विराट कोहलीने आपले अर्धशतक ५९ चेंडूत पूर्ण केले. या अर्धशतकी खेळीमध्ये त्याने ३ चौकर खेचले. भारतीय चाहत्यांना कर्णधाराकडून शतकाची अपेक्षा असणार आहे.
भारत आता १६५ धावांवर १ बाद अश्या सुस्थितीत आहे. विराट कोहली ५० धावांवर खेळात आहे तर रोहित शर्मा हा त्याच्या कारकिर्दीतील शतकाच्या जवळ आहे.
तो ९७ धावांवर खेळत आहे. जर या दोन फलंदाजनपैकी एकही फलंदाज शेवटच्या षटका पर्यंत टिकला तर भारताचा स्कोर ३५० धावांच्या पुढे जाईल.