इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर होत आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याचवेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वी केलेल्या एका कृतीमुळे इंग्लिश चाहत्याचे मन जिंकले.
विराटचे चाहत्याने मानले आभार
मालिकेतील पहिल्याच सामन्यासाठी भारतीय संघात अनुभवी फिरकीपटू रविचंद्र अश्विन याला संधी मिळाली नाही. त्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. इंग्लंडचा माजी कर्णधार व समालोचक मायकेल वॉनने या बाबत ट्विट करताना लिहिले, ‘वाह! रविचंद्रन अश्विन नाही’
त्यावर एका इंग्लिश चाहत्याने उत्तर देताना लिहिले, ‘नाही, मात्र त्याने माझ्या मुलाला स्पाईक (शूज) दिले आहेत.’
No but Virat gave my son his spikes!! pic.twitter.com/mzfnyaNXPB
— robert burns (@robertb37038936) August 4, 2021
या चाहत्याने आणखी एक ट्वीट करताना म्हटले, ‘लुकास बर्न्सकडून आभार! विराट कोहली तू मुलाला खूप आनंदी केलेस. या जागतिक सिताऱ्याकडून स्पाईक भेट म्हणून मिळाले.’
Thank you from Lucas Burns @imVkohli you have made an excited boy very happy!! Spikes from the nicest global superstar!!@MacclesfieldCC @kingsmaccricket pic.twitter.com/5DcH68fhDD
— robert burns (@robertb37038936) August 4, 2021
यापूर्वी देखील विराट आपल्या चाहत्यांशी अत्यंत प्रेमाने वागताना दिसून आला आहे.
दोन्ही संघांच्या संघनिवडीवर व्यक्त केले गेले आश्चर्य
या पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आश्चर्यजनक संघ बदल केले. भारतीय संघाने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा व सर्वात वरिष्ठ वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्याऐवजी शार्दुल ठाकूरला पहिली संधी दिली गेली.
दुसरीकडे, इंग्लंडने देखील आपल्या संघात कोणताही तज्ञ फिरकीपटू खेळवला नाही. तसेच, सराव सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या हसिब हमीदला संघात निवडले गेले नाही.
इंग्लंडची खराब सुरुवात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय इंग्लंड संघाला लाभदायी ठरला नाही. रोरी बर्न्स हा पहिल्याच षटकात खाते न खोलता माघारी परतला. जम बसलेला झॅक क्राऊली २७ तर, डॉम सिब्ली १८, बेअरस्टो २७ धावांवर माघारी परतले. इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर ५०.२ षटकात ४ बाद १३८ धावांची मजल मारली आहे. भारताकडून मोहम्मद शमीने २ आणि जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजसाठी पाऊस बनला खलनायक, पाकिस्तानने जिंकली टी२० मालिका
केकेआरच्या अडचणीत वाढ, ‘या’ कारणामुळे सर्वात महागड्या खेळाडूची उर्वरित हंगामातून माघार