सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यानंतर टी२० मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. आता भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांत इंग्लंडपेक्षा वरचढ होण्यासाठी सज्ज आहे. यावेळी मात्र, भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार याला संघातून बाहेर रहावे लागेल अशी शक्यता आहे.
फॉर्मात नसलेला फलंदाज विराट कोहलीला तिसऱ्या टी२० दरम्यान कंबरेच्या दुखापतीमुळे मंगळवारी ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणे संशयास्पद झाले आहे. कोहलीच्या दुखापतीचे तपशील माहित नाहीत परंतु भारतीय संघ व्यवस्थापन त्याला पहिल्या सामन्यात विश्रांती देऊ शकते जेणेकरून तो अनुक्रमे१४ जुलै आणि १७ जुलै रोजी होणार्या पुढील दोन सामन्यांसाठी उपलब्ध राहील, अशी माहिती बीसीसीआयच्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “गेल्या सामन्यात विराटच्या मांडीला दुखापत झाली होती. फलंदाजी करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना हे घडले हे अद्याप कळू शकलेले नाही. तो कदाचित उद्याचा सामना खेळणार नाही.”
कोहली टीम बसने नॉटिंगहॅमहून लंडनला आला नसल्याचे कळते. यामागे वैद्यकीय तपासणी हे कारण असू शकते. शिखर धवन, शार्दुल ठाकूर आणि प्रमुख कृष्णा, ज्यांची सोमवारी केवळ एकदिवसीय संघासाठी निवड करण्यात आली होती, त्यांनी वैकल्पिक सराव सत्रात भाग घेतला. त्यामुळेच वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी संघाची निवड आता मंगळवारी होणार आहे. भारतीय कॅम्पच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, “कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या संपूर्ण मालिकेत विश्रांतीची मागणी केली आहे.”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली खराब फॉर्मसोबत झुंजत आहे. त्यामुळेच त्याला संघातून वगळण्यात यावे अशी मागणी केवळ चाहत्यांकडूनच नव्हे, तर अनेक क्रिकेट दिग्गजांकडून केली जात होती. मात्र, संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपण विराटच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले होते. मात्र आता विराट दुखापतीमुळे संघातून बाहेर राहिल्यास त्याचे पुनरागमन आणखी अवघड होऊन बसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सचिन-कोहली, सेहवाग-रोहित, धोनी-?’, प्लेअर्सच्या रिप्लेसमेंटवर एका चाहत्याचे ट्वीट होतंय व्हायरल
कहर! आयपीएलचे आयोजन अन् रशियन लोकांची फसवणूक, वाचा काय आहे प्रकरण
नावात ‘जोकर’, पण कमाईच्या बाबतीत मात्र बादशाह! सचिन अन् विराटवरही ठरला वरचढ