आयपीएल २०२२ स्पर्धेत आज (८ एप्रिल) पहिल्यांदा डबर हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये खेळवला जात आहे. तर दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने सामने असणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात विराट कोहलीचा एक मोठा डाव फसताना दिसून आला आहे.
या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. ही खेळपट्टी स्लो असल्या कारणाने विराट कोहलीने ४.८ कोटी खर्च करून संघात समाविष्ट केलेल्या डेनियल ख्रिस्टियन ऐवजी रजत पाटीदारला संधी दिली होती. परंतु रजत पाटीदारला या संधीचे सोने करण्यात अपयश आले आहे. तो २ चेंडू खेळून १ धाव करत माघारी परतला. वरून चक्रवर्तीने त्याला क्लीन बोल्ड केले आहे.
विराट कोहलीने रजत पाटीदारला संघात समाविष्ट करण्यामागचे स्पष्टीकरण देखील दिले होते. तो म्हणाला होता की, “चेन्नईच्या स्लो खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आम्ही रजत पाटीदारला संधी देत आहोत. रजत पाटीदार फिरकी गोलंदाजांना चांगला खेळून काढतो.” रजतला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले होते.
असा आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ-
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, काइल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल
असा आहे कोलकाता नाईट रायडर्स संघ-
नितीश राणा, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, ऑएन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, हरभजन सिंग, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती
महत्त्वाच्या बातम्या-
मॉर्गनविरुद्ध गेल्या ८ सामन्यात पहिल्यांदाच विराटने जिंकला टॉस, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
गोलमाल है भाई, सब गोलमाल है! नटराजनला संघाबाहेर ठेवण्याबाबत मूडी आणि लक्ष्मणचे वेगवेगळे विधान






