भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षात त्याने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय संघाला जेतेपद मिळवायचे असेल तर, विराट कोहलीने चांगली फलंदाजी करणे आवश्यक असणार आहे.तसेच या मोठ्या सामन्यात तो आणखी एक विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
विराट कोहलीला २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकवता आले नाहीये. त्याने बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. जर त्याला आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक झळकावण्यात यश आले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा कर्णधार ठरू शकतो. याबाबतीत तो दिग्गज फलंदाज, रिकी पाँटिंगला मागे टाकू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून दोघांच्या नावे ४१-४१ शतक आहेत.
एक शतक झळकावताच त्याच्या नावे कर्णधार म्हणून ४२ शतक पूर्ण होतील. तसेच तो कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावणारा कर्णधार ठरेल. विराट कोहली बद्दल भाष्य करताना पार्थिव पटेल म्हणाला होता की,”विराटने २०१८ मध्ये जशी कामगिरी केली होती. त्यावरून तो नक्कीच प्रेरणा घेईल.माझे असे म्हणणे आहे की, तो स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करेल आणि २०१८ मध्ये त्याने कशी कामगिरी केली होती, किती शतके केली होती याचा विचार करेल. ”
कोहलीची कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी
विराट कोहलीने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एकूण १४ सामने खेळले आहेत. यात त्याला ४३.८५ च्या सरासरीने ८७७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ शतक आणि ५ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शाहिद आफ्रिदीने निवडली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, केवळ एका भारतीय खेळाडूला दिले स्थान
ना स्मिथ, ना कमिन्स! टीम पेनच्या मते हा खेळाडू असेल ऑस्ट्रेलियाचा पुढील कर्णधार
WTC फायनलमध्ये या दोन खेळाडूंना एकत्र खेळतांना पाहण्याची व्हीव्हीएस लक्ष्मण यांची इच्छा