मँचेस्टर। आज(16 जून) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु आहे. या सामन्याच्या पुर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने खेळाडूंकडे तिकीटांची मागणी करणाऱ्या चाहत्यांना मजेशीर संदेश दिला आहे.
भारत – पाकिस्तान सारख्या मोठ्या सामन्यांच्या पासची किंवा तिकींटांची मागणी करणाऱ्या चाहत्यांना विराट कसा हताळतो याबद्दल सांगताना विराट म्हणाला, ‘तूम्ही जेव्हा अशा स्पर्धेसाठी निघता तेव्हा तूम्ही आधीच लोकांना सांगून ठेवले पाहिजे.’
‘अगदी माझे मित्रही मला विचारतात, ‘आम्ही येऊ का.’ मी त्यांना सांगतो मला विचारु नका. तूम्हाला जर यायचे असेल(सामन्यासाठी) नक्की या. नाहीतर प्रत्येकाच्या घरी चांगला टीव्ही आहे आणि तूम्ही घरी सामना पाहू शकता.’
पुढे विराट म्हणाला, ‘जर तूम्ही तिकीटे किंवा पास आयोजित करायला सुरुवात केली, तर त्याला शेवट नाही. दोन पासचे तीन होतात, तीनचे सहा होतात आणि हे असेच चालू राहते.’
‘आम्हाला काही मोजके तिकीटे मिळतात आणि जर आमच्या कुटुंबातील सदस्य सामना पहायला येणार असतील तर आम्हाला त्यांची सोय करावी लागते. मी जास्त लोकांनी पाससाठी तिकीट न मागण्याला प्राधान्य देतो.’
विराटच्या या मजेशीर उत्तराचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
Looking for passes for the Ind-Pak clash? @imVkohli has a special message for you guys 😁😁👌👌 #TeamIndia #CWC19 #INDvPAK pic.twitter.com/Ffahfp90Wz
— BCCI (@BCCI) June 15, 2019
या विश्वचषकातील भारताचा पाकिस्तान विरुद्ध होणारा हा चौथा सामना आहे. याआधी भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला आहे. तसेच न्यूझीलंड विरुद्धचा भारताचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: ‘द वॉल’ राहुल द्रविडला मागे टाकत एमएस धोनीने केला हा खास पराक्रम
–विश्वचषक २०१९: आजच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–विश्वचषक २०१९: किंग कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचण्याची आज सुवर्णसंधी