---Advertisement---

स्वत:चेच दोन खास फोटो शेअर करत कोहलीने दिला चाहत्यांना हा खास मंत्र

On: मंगळवार, ऑक्टोबर 16, 2018 5:53 PM
---Advertisement---

विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. एक खाद्य प्रेमी ते सर्वात तंदुरूस्त क्रिकेटपटू असा त्याचा प्रवास राहिला आहे. कोहलीने त्याच्या चाहत्यांना ट्विटरवरून एक संदेेश दिला आहे. त्यामध्ये विराटने त्याचे दोन फोटो एकत्र केले आहेत. या दोन फोटोंमधील एक फोटो जुना आणि एक आताचा आहे.

या ट्विटमधून विराटने चाहत्यांना मेहनत करुन फीट राहण्याचा सल्ला दिला आहे. कोहलीने फिटनेस मिळवण्यासाठी खुप कष्ट घेतले आहेत.

कोहलीला बटर चिकन आणि कबाब खुप आवडायचे मात्र तंदुरूस्त राहण्यासाठी त्याने ‘वेगन’ जीवन पद्धती अवलंबली आहे. वेगन पद्धतीत फक्त वनस्पतीपासून मिळणाऱ्या अनपदार्थांचा वापर दैनंदिन जीवनात केला जातो.

त्यामुळेच विराट आता अंडी आणि मांसातील प्रथिनांऐवजी भाज्यातील आणि सोयाबीन मधील  प्रथिन घेत आहे. वेगन पद्धतीचा आहार कोहली चार महिन्यापासून घेत आहे. त्यामुळे त्याच्या पचनशक्तीत सुधारणा झाली आहे.

कोहली हा भारतीय संघातील सर्वात फीट खेळांडूपैकी एक आहे. कोहलीची कामगिरीही  सर्वात वरचढ होत आहे.

त्याने विंडीजविरूद्धच्या पहिल्या कसोटी शतक केले होते.  तो  भारतात 3 हजार पेक्षा जास्त धावा करणारा11 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. अशिया खंडात कर्णधार म्हणून खेळतानाही कोहलीने सर्वात जास्त धावा काढल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment