---Advertisement---

रनमशीन कोहली..! चेन्नईविरूद्ध अर्धशतक झळकावून कोहलीने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 52वा सामना शनिवारी (3 मे) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यासाठी चॅम्पियन संघ चेन्नई सुुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) संघ आमने-सामने होते. यावेळी एमएस धोनीने टाॅस जिंकून आरसीबीला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. दरम्यान स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.

कोहलीने चेन्नईविरूद्ध फलंदाजी करताना 33 चेंडूत 62 धावांची आक्रमक खेळी केली. तो या सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक अंदाजात खेळताना दिसला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकारांसह 5 खणखणीत षटकार ठोकले. 62 धावांसह तो आयपीएलच्या इतिहासात एका संघाविरूद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. कोहलीने चेन्नईविरूद्ध आतापर्यंत (1,146) धावा केल्या आहेत.

यासोबतच विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक वेळा 500+ धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 8 वेळा अशी कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात तो चांगल्याच फाॅर्मात आहे. किंग कोहलीने आयपीएल 2025 मध्ये आता 505 धावा केल्या आहेत. विराटने साई सुदर्शनकडून ऑरेंज कॅप हिसकावून घेतली आहे. पण, विराट गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनपेक्षा फक्त एक धाव पुढे आहे. साई सुदर्शनने आयपीएल 2025 मध्ये 504 धावा केल्या आहेत. तसेच विराटने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 5 षटकार मारले. तो आता टी20 क्रिकेटच्या इतिहासात एकाच मैदानावर सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे.

आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा 500+ धावा

8 – विराट कोहली*

7 – डेव्हिड वॉर्नर

6 – केएल राहुल

5 – शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---