पुणे। भारत विरुद्ध विंडीज संघात शनिवारी(27 आॅक्टोबर) तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात विंडीजने 43 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतक करत चांगली लढत दिली होती.
त्याने या सामन्यात 119 चेंडूत 107 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारले. हे त्याचे वनडेतील सलग तिसरे शतक होते. त्याने विंडीज विरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यातही शतके केली होती. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यात शतक करणारा तो जगातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही.
त्याचबरोबर वनडेत सलग तीन शतके करणारा तो पहिला भारतीय खेळाडूही ठरला आहे. तसेच जगातील एकुण 10 वा खेळाडू ठरला आहे.
याआधी अशी कामगिरी कुमार संगकारा, झहीर अब्बास, सइद अन्वर, हर्षल गिब्स, एबी डिविलीयर्स, क्विंटॉन डिकॉक, रॉस टेलर, बाबर आझम आणि जॉनी बेअरस्टो यांनी केला आहे.
यातील संगकारा व्यतिरिक्त अन्य खेळाडूंनी सलग 3 शतके केले आहेत. तर संगकाराने सलग 4 शतके करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे आता विराटला संगकाराचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
भारताचा विंडीज विरुद्ध चौथा वऩडे सामना मुंबईला 29 आॅक्टोबरला होँणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–भारत ‘क’ने पटकावले देवभर ट्रॉफीचे विजेतेपद; अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा हिरो
–Video: खेळाडू परतले, पंच मात्र निर्णय देण्यासाठी भरपावसात मैदानातच