मंगळवारी (०२ ऑगस्ट) सेंट किट्स येथे झालेला तिसरा टी२० सामना भारतीय संघाने ७ विकेट्स राखून जिंकला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत वेस्ट इंडिजवर २-१ ने आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय सलामीवीर सूर्यकुमार यादव याला मोठा फायदा झाला आहे. दुसरीकडे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
विराट वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies vs India) सुरू असलेल्या टी२० मालिकेचा भाग नाही. तरीही आयसीसीच्या फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत (ICC T20I Ranking) त्याची मोठी घसरण झाली आहे. मागील ३ वर्षांपासून खराब फॉर्मशी झगडत असलेला विराट (Virat Kohli) २८ व्या स्थानावर घसरला आहे. वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रेंडन किंग याने ५४६ गुणांसह विराटला पिछाडीवर सोडले आहे. सध्या विराटच्या खात्यात ५३९ गुण आहेत.
वर्ष २०१२ नंतर अर्थात गेल्या १० वर्षांमध्ये विराटने आयसीसी टी२० क्रमवारीत मिळवलेले हे सर्वात निच्चांकी स्थान आहे. जानेवारी २०१७ मध्ये विराट टी२० क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान होता. जवळपास ५ वर्षे त्याचे हे स्थान कोणताच फलंदाज हिरावू शकला नव्हता. मात्र त्यानंतर त्याची हळूहळू घसरण सुरू झाली आणि मार्च २०२१ मध्ये तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला. त्यानंतर आता ऑगस्ट २०२२ मध्ये तो थेट टॉप-१० नव्हे टॉप-१० मधूनही बाहेर झाला आहे.
दुसरीकडे ताज्या टी२० क्रमवारीत सूर्यकुमारला (Suryakumar Yadav) मोठा फायदा झाला आहे. तो चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याच्या खात्यात ८१६ गुण आहेत. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अव्वलस्थानी कायम आहे. त्याच्या खात्यात सध्या सर्वाधिक ८१८ गुण आहेत. अर्थात आता सूर्यकुमारला पहिल्या स्थानी पोहोचण्यासाठी फक्त २ गुणांची गरज आहे. याशिवाय फलंदाजांच्या ताज्या टी२० क्रमवारीत पहिल्या १० जणांमध्ये स्थान मिळवणाराही तो पहिलाच भारतीय आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादवची नवीन स्पोर्ट्स कार, वेस्ट इंडीजची धुलाई केल्यानंतर दिले स्वतःलाच गिफ्ट
दुखापतग्रस्त असूनही रोहितने गाजवले मैदान! चाहते म्हणाले, ‘कॅप्टन असावा तर असा’
CWG2022: भारतीय महिला हॉकी संघाची पाचव्यांदा उपांत्यफेरीत एंट्री, कॅनडाला केले पराभूत






