भारतीय संघ घरच्या मैदानावर बांगलादेशविरूद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. सध्या भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी चेन्नईमध्ये सराव करत आहे. तत्पूर्वी दिग्गज विराट कोहलीने (Virat Kohli) एका स्टार भारतीय गोलंदाजाला आपली बॅट गिफ्ट केली आहे. कोहलीने आपला सहकारी क्रिकेटपटू आकाश दीपला बॅट (Akash Deep) दिल्याने तो आता चर्चेचा विषय बनला आहे.
बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. त्यामध्ये आकाश दीपची देखील निवड झाली आहे. उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आकाशने इंस्टाग्रामवर कोहलीच्या बॅटचा एमआरएफ (MRF) स्टिकर असलेला फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “विराट भाई धन्यवाद.”
आकाश दीपच्या (Akash Deep) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी केवळ 1 कसोटी सामना खेळला आहे. पदार्पण सामन्यातच त्याने भारतासाठी 3 विकेट्स घेतल्या होत्या. आकाश दीप सध्या दुलीप ट्राॅफी (Duleep Trophy) स्पर्धा खेळत आहे. शुबमन गिल (Shubman Gill) कर्णधार असलेल्या इंडिया-अ संघाचा तो भाग आहे. दरम्यान त्याने या स्पर्धेत एकच सामना खेळला आणि 9 विकेट्स घेऊन कहर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताविरूद्ध कहर केलेल्या स्टार खेळाडूला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर
न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन
सोनी-स्टारवर दिसणार नाही भारत-बांगलादेश मालिका, या चॅनलवर पाहा फ्री!