भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर कसोटी मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 191 धावांनी आघाडीवर आहे. पण भारतीय फलंदाज देखील चांगले प्रदर्शन करताना दिसले. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली शनिवारी (11 मार्च) नाबाद 59 धावा करून पव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान, विराटने एक मोठी कामगिरीही केली.
विराट कोहली (Virat Kohli) शनिवारी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. त्याने अहमदाबाद कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 128 धावा करून नाबाद 59 धावा केल्या. विराट आणि रविंद्र जडेजा (16) सध्या खेळपट्टीवर कायम आहेत. शनिवारी विराटने केलेल्या या 59 धावांच्या जोरावर त्याने आपल्या 4000 कसोटी धावा पूर्ण केल्या. विराट 4000 कसोटी धावा करणारा भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनिल गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी कसोटी फॉरमॅटमध्ये भारतासाठी 4000 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. विराट आता या दिग्गजांच्या यादीत नव्याने जोडला गेला आहे.
भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज
7216 – सचिन तेंडुलकर
5598 – राहुल द्रविड
5067 – सुनिल गावसकर
4656 – विरेंद्र सेहवाग
4000 – विराट कोहली*
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर तर भारतीय संघ तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 289 धावा करू शकला. विराट कोहलीचे अर्धशतक संघासाठी महत्वाचे ठरलेच, पण त्याहून महत्वाची खेळी केली शुबमन गिल (Shubman Gill) याने. गिलने 235 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकार मारून 128 धावा कुटल्या. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरेच षटक होते. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया त्यांच्या पहिल्या डावात 480 धावा कुटल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा याने 180, तर कॅमरून ग्रीन याने 114 धावांचे योगादन दिल्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी करता आली.
गोलंदाजी विभागाची विचार केला, तर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यावेळीही चमकदार कामगिरी करू शकला. अश्विनने 47.2 षटकांमध्ये 91 धावा देत सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला 2, तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! अहमदाबाद कसोटीवर खलिस्तानींची नजर! हल्ल्याच्या धमकीनंतर वाढवली दोन्ही संघांची सुरक्षा
बुमराहनंतर मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज आयपीएल 2023 साठी उपस्थित नसणार