बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी (2 आॅगस्ट) पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने एक खास विश्वविक्रमही रचला आहे.
विराटने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने कसोटीत कर्णधार म्हणून ३६०५ धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ३०५९ धावा केल्या आहेत. तर टी२०मध्ये ४४५ धावा केल्या आहेत.
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७००० धावा करणारा तो चौथा कर्णधार ठरला आहे. यापुर्वी केवळ एमएस धोनी (१११९९), मोहम्मद अझरुद्दीन (८०९५) आणि सौरव गांगुली (७६४३) धावा केल्या आहेत.
कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण करणारे भारतीय फलंदाज:
11199 धावा – एमएस धोनी
8095 धावा – मोहम्मद अझरुद्दीन
7643 धावा – सौरव गांगुली
7109 धावा – विराट कोहली#म #मराठी @Maha_Sports @MarathiBrain @MarathiRT @kridajagat
— Pranali Kodre (@Pranali_k18) August 2, 2018
तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7000 धावांचा टप्पा गाठणारा कर्णधार ठरला आहे. त्याने 124 डावात हा टप्पा पार केला आहे.
विराटने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 105 सामने खेळले असून यात 124 डावात 67.70 च्या सरासरीने 7109 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 28 शतकांचा आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच त्याने भारताचे नेतृत्व करताना कसोटीत 36 सामन्यात 3605 धावा केल्या आहेत. विराट कर्णधार म्हणून भारताकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–यापूर्वी जगातील कोणत्याच क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असा निर्णय घेतला नसेल
–१९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेने दिला धक्का
–इंग्लंड येणार गोत्यात, महत्त्वाचा खेळाडू जायबंदी