विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सोमवारच्या (1 मे) सामन्यात पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर यांच्यातील हा वाद अजूनही चर्चेचा विषय ठरत आहे. विराटने गंभीरच्या आधी नवीन उल हक याच्याशीही वाद घेतला. या वादांनंतर मैदानातील वातावरण शांत करण्यासाठी आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याची भूमिका महत्वाची राहिली. मात्र, डू प्लेसिससने सोबतच विराटचे हे रूप सर्वोत्तम असल्याचे सांगितले.
विराट कोहली (Virat Kohli) याने या सामन्यात गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्याशी वाद घातलाच. पण त्याआधी विराटने खेळपट्टीवर असलेल्या नवीन उल हक आणि अमित मिश्रा यांनाही सुनावले होते. सामना संपल्यानंतर हातमिळवणी करताना विराट आणि नवीन उल हक () यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे दिसले. त्यानंतर काहीच वेळात गंभीर देखील विराटवर संतापला. त्याआधी विराटने क्षेत्ररक्षण करताना कृणाल पंड्याचा झेल घेतल्यानंतर गंभीरची खिल्ली उडवण्यासाठी एक रिएक्शन देखील दिली होती.
विराट कोहली या सामन्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. चाहते सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत असले, तरी त्याच्यावर निशाणा साधणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. असे असले तरी, आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Naveen-ul-Haq) याला सोमवारच्या सामन्यातील विराटची वागणून आवडली. सामना संपल्यानंतर डू प्लेसिस म्हणाला, “हे विराटचे सर्वोत्तम रूप आहे. जेव्हा तो आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो, तेव्हा असाच उत्साहाने भरलेला दिसतो. या विजयाचा भाग बनने अप्रतिम अनुभव आहे. माझे काम मैदानात सर्व गोष्टी शांत ठेवणे आहे आणि मला असे वाटते की, मी खरोखर ही भूमिका पार पाडली.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघ 19.5 षटकांमध्ये 108 धावा करून सर्वबाद झाला. (Virat Kohli has received support from Faf du Plessis after his spat with Gautam Gambhir)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जबरा फॅन! गंभीरसोबतच्या वादाआधी विराटचे पाय धरण्यासाठी चाहत्याची थेट मैदानात एन्ट्री
कोण आहे नवीन उल हक? ज्याच्यामुळे विराट अन् गंभीरचं झालं भांडण, अफगाणिस्तानातून आयपीएलपर्यंत कसा आला?