दिग्गज विराट कोहलीसाठी आजचा दिवस खूप खास, जाणून घ्या यादिवशीचे ‘विराट’ रेकाॅर्ड्स

अलिकडेच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत (Border Gavaskar Trophy) विराट कोहली (Virat Kohli) फ्लाॅप ठरला. तत्पूर्वी (15 डिसेंबर) म्हणजे आजचा दिवस दिग्गज फलंदाज विराट कोहलीसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. पण याच दिवशी त्याने अनेक मोठे रेकाॅर्डदेखील केले आहेत. या बातमीद्वारे आपण विराटने (15 जानेवारी) रोजी काय रेकाॅर्ड केले ते जाणून घेऊया.
विराट कोहलीने (Virat Kohli) (15 जानेवारी) रोजी अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत. या दिवशी विराटने एकूण 4 शतके झळकावली आहेत. त्यामध्ये 3 वनडे आणि 1 कसोटी शतकाचा समावेश आहे. सगळ्यात आधी विराटने या दिवशी 2017 मध्ये इंग्लंडविरूद्ध वनडे सामन्यामध्ये पुण्यात 122 धावा केल्या होत्या.
त्यानंतर पुढच्या वर्षी 2018 मध्ये, (15 जानेवारी 2018) रोजी विराटने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात 153 धावा केल्या. तर (15 जानेवारी 2019) रोजी त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या गेलेल्या वनडेत 104 धावा केल्या. (15 जानेवारी 2023) रोजी, विराटने श्रीलंकेविरूद्ध वनडेत नाबाद 166 धावा केल्या.
15 जानेवारी रोजी विराट कोहलीची शतके-
2017 विरूद्ध इंग्लंड 122 धावा (वनडे)
2018 विरूद्ध दक्षिण आफ्रिका 153 धावा (कसोटी)
2019 विरूद्ध ऑस्ट्रेलिया 104 धावा, (वनडे)
2023 विरूद्ध श्रीलंका नाबाद 166, (वनडे)
विराट कोहलीने (Virat Kohli) (15 जानेवारी रोजी) भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. भारताने 2021-22 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली. या मालिकेत भारताला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर विराटने भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना (11 ते 15 जानेवारी) दरम्यान होणार होता, परंतु सामना एक दिवस आधी म्हणजे (14 जानेवारी) रोजी संपला. यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे (15 जानेवारी) रोजी विराटने कर्णधारपद सोडले.
विराटच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने कसोटीत भारतासाठी कसोटीत 2011ला पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 210 डावात फलंदाजी करताना 46.85च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. कसोटीत विराटने 31 अर्धशतकांसह 30 शतके आणि 7 द्विशतके झळकावली आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केलने सर्वांसमोर बोलणे खाल्ले, ऑस्ट्रेलियात भयंकर चिडला होता गौतम गंभीर!
रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? बीसीसीआयनं काय निर्णय घेतला?
आकाश चोप्रांनी भारतीय खेळाडूंना फटकारले, बीसीसीआयच्या या निर्णयाचं समर्थन