---Advertisement---

घणाघाती शतकासह विराटने 16 वर्षातील मोठा विक्रम करून घेतला नावे; रोहित पडला मागे

---Advertisement---

आशिया चषक 2022 मधील पाचवा सुपर फोर सामना भारत व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला.‌ या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. नियमित करणे धार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघासाठी विराट कोहली व केएल राहुल यांनी सलामी दिली. बऱ्याच कालावधीनंतर सलामीला उतरलेल्या विराट कोहली याने शानदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय टी20 मधील आपले पहिले पहिले शतक झळकावले. त्याच्या शतकी खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

 

विराटने या सामन्यात एकूण अवघ्या 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. शतक पूर्ण करण्यासाठी त्याला एकूण 53 चेंडू खेळावे लागले. त्याने हे शतक पूर्ण करताना भारतातर्फे टी20 तील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. यापूर्वी रोहित शर्माने भारतासाठी 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 118 धावा चोपलेल्या. याच वर्षी सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्ध 117 तर रोहित व‌ केएल राहुल यांनी अनुक्रमे 111 व 110 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---