गॉलचा विजय कसोटी कर्णधार म्हणून कोहलीचा १७ वा विजय होता, तसेच कसोटीमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार गांगुलीपेक्षा विराट आता फक्त चारच विजय दूर आहे.
तरीही भारताच्या या माजी कर्णधाराला वाटते की कोहलीच्या नेतृत्वाची खरी परीक्षा इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या दौऱ्यावर असणार आहे.
“विराटची अद्यापही देशाबाहेर परीक्षा झाली नाही. श्रीलंकेचा सध्याचा संघ दुबळा आहे. विराटचा हा संघ दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशात कसा खेळ करतो हे अजून पहायचे आहे. विराटच्या नेतृत्व गुणांचीही खरी परीक्षा तेथेच असेल”. असे गांगुली म्हणाला.
गॉल येथे भारताच्या क्लिनिकल कामगिरीची प्रशंसा ही त्याने केली. श्रीलंकाविरूद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १०- अशी आघाडी घेतली आहे, तर दादाला अपेक्षा आहे की यजमान संघ बाकी मालिकेतही चांगली कामगिरी करू शकणार नाही.
“फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारत समतोल आहे. दुसरीकडे श्रीलंकेला खूप गोष्टी सुधरवायच्या आहेत,” असेही गांगुली पुढे म्हणाला.