---Advertisement---

कोहलीचे पुन्हा एकदा ‘विराट’ दर्शन! तीन वर्षांनंतर वनडेत झळकावले शतक

On: शनिवार, डिसेंबर 10, 2022 2:52 PM
---Advertisement---

शनिवारी (दि. 10 डिसेंबर) बांगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा आणि अखेरचा वनडे सामना खेळला जात आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या भारतासाठी हा ‘करो वा मरो’ सामना आहे. झहुर अहमद चौधरी स्टेडिअम, चट्टोग्राममधील या सामन्यात संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने देखील आपला दर्जा दाखवून देत शानदार शतक साजरे केले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 72 वे शतक ठरले.

 

सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यानंतर विराट मैदानावर उतरला होता. त्यावेळी दुसऱ्या बाजूने दुसरा सलामीवीर ईशान किशन अक्षरशः बांगलादेशच्या गोलंदाजांवर तुटून पडत होता. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक द्विशतकात रूपांतरित केले. दरम्यान विराट एकेरी दुहेरी धावांसह खराब चेंडूंचा समाचार घेत मोठे फटके मारत होता.

त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील 44 वे शतक पूर्ण करताना 11 चौकार व एका षटकार लगावले. त्याने हे शतक अवघ्या 85 चेंडूवर झळकावले. विराटने तब्बल तीन वर्षाच्या काळानंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत तो रिकी पॉंटिंग याला पछाडत 72 शतकांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला.

शतक झळकावल्यानंतर विराटने‌ आणखी आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच प्रयत्नात तो बाद झाला. त्याने बाद होण्यापूर्वी 91 चेंडूवर 11 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या.

(Virat Kohli Hits 72 International Century Against Bangladesh In 3Rd ODI)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

विश्वविक्रमवीर ईशान किशन! तिसऱ्या वनडेत ठोकले वादळी द्विशतक 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---