रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्या बॅटमधून आणखी एक शतक आले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 74 वे शतक ठरले. मात्र, 15 जानेवारी या दिवसाचे विराटसह खास नाते असल्याचे देखील दिसून येत आहे.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने मैदानावर टिच्चून फलंदाजी केली. यावेळी विराटने 85 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. यासह तो अनेक विक्रमांचा धनी बनला. विराटने त्याच्या खेळीत 110 चेंडूंचा सामना करताना 8 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 166 धावा चोपल्या. त्याच्या या शानदार खेळीने भारताने 50 षटकात 5 बाद 390 धावा धावफलकावर लावल्या.
विराट मागील 14 वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान त्याच्यासाठी 15 जानेवारी ही तारीख नेहमीच खास ठरलेली दिसते. विराटने या दिवशी आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत चार शतके साजरी केली आहेत. सर्वप्रथम विराटने 2017 मध्ये पुणे येथील वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक साजरे केलेले. त्याने या सामन्यात 102 चेंडूंवर 122 धावांची खेळी केली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जोहान्सबर्ग कसोटीत 153 धावा काढलेल्या. तर, 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यात 104 धावा चोपलेल्या. त्यानंतर आता त्याने याच दिवशी आणखी एक शतक पूर्ण केले.
या सामन्याचा विचार केल्यास, भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 390 धावा चोपल्या. भारताकडून विराटव्यतिरिक्त शुबमन गिल (Shubman Gill) यानेही शतक झळकावले. त्याने 97 चेंडूत 116 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 14 चौकारांचा पाऊस पाडला. तसेच, कर्णधार रोहित शर्मा (42) आणि श्रेयस अय्यर (38) यांनीही खारीचा वाटा उचलला.
(Virat Kohli Hits Fourth International Century On 15 January)
महत्वाच्या बातम्या-
एकदमच टॉपला! सध्या खेळत असलेल्या खेळाडूंत कोणीही नाही विराटच्या आसपास; पाहा ही आकडेवारी
INDvSL: शुबमन गिलच्या शतकाआधी युवराज सिंगने म्हटले, ‘क्रिकेट मरतय का?’; जाणून घ्या कारण