दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहसह विराट कोहली या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे हे खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत सुट्ट्या घालवत आहेत. अशात विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका शर्मा यांच्यासह मालदीव येथे सुट्ट्या साजरा करण्यासाठी गेला आहे. त्यांचे मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नुकतेच विराटची (Virat Kohli) पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्काने (Anushka Sharma) मालदीवच्या (Maldives) समुद्रकिनाऱ्यावरील तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रोमांचक बाब अशी की, हे फोटो स्वत अनुष्काने क्लिक केले आहेत. तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. अनुष्का फोटोंमध्ये नारंगी रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे.
हे फोटो शेअर करत अनुष्काने मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिले आहे की, ‘आपले फोटो स्वत:च क्लिक केल्याचा निकाल’. तसेच आपण हे फोटो क्लिक करण्यासाठी कॅमेरा ३ सेकंदांच्या फ्रेमवर सेट केला असल्याचे तिने सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/CesavW_JVd7/?utm_source=ig_web_copy_link
याखेरीज विराटनेही त्याचा समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो विनाशर्ट दिसत आहे. विराट या फोटोत खूप हॉट दिसत असून त्याच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
https://www.instagram.com/p/CetHLYkPh1n/?utm_source=ig_web_copy_link
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला खेळायचे आहेत ७ सामने
दरम्यान विराटला आयपीएल २०२२ च्या रणधुमाळीनंतर २० दिवसांसाठी विश्रांती दिली गेली आहे. तो १५-१६ जून रोजी भारतीय संघासोबत इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ त्यांचा राहिलेला पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत हा खेळवला जाईल. गतवर्षी कोरोनामुळे भारत आणि इंग्लंडमधील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला होता. या कसोटी मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.
त्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० मालिका होईल. ही मालिका ७ ते १० जुलैदरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर दोन्ही संघ १२ ते १७ जुलै, या कालावधीत ३ सामन्यांची वनडे मालिका खेळतील.
इंग्लंडविरुद्ध भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसीध कृष्णा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा