---Advertisement---

विराटने मिठी मारली की रिटायरमेंट पक्की! पहा फोटो काय सांगतायेत?

On: रविवार, मार्च 9, 2025 6:31 PM
---Advertisement---

आज (9 मार्च) आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. या सामन्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यानंतर रवींद्र जडेजा निवृत्त होऊ शकतो. (Ravindra Jadeja Retirement)

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने असताना एक अनोखा क्षण पाहायला मिळाला. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने त्याच्या स्पेलची 10 षटके पूर्ण करताच विराट कोहलीने त्याला प्रेमळ मिठी मारली. या क्षणानंतर क्रिकेट वर्तुळात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली.

याच्या मागील संदर्भ पाहिला तर, विराटच्या अशा मिठी मागे काहीतरी अर्थ असतो, असा विश्वास चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. याआधी, जेव्हा रवीचंद्रन अश्विनने निवृत्ती जाहीर केली होती, तेव्हा देखील विराटने त्याला भावनिक मिठी दिली होती. तसेच, भारत-ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीनंतर स्टीव्ह स्मिथलाही कोहलीने मिठी मारली होती, आणि त्यानंतर स्मिथने निवृत्तीची घोषणा केली.

आता जडेजाच्या बाबतीतही असेच घडत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. जडेजा खरोखरच निवृत्तीची घोषणा करणार का, की हा केवळ एक खेळाडू म्हणून मिळालेला सन्मान होता? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल सामन्यात जडेजाने 10 षटकांत फक्त 30 धावा दिल्या आणि 1 विकेटही घेतली. त्याने टॉम लॅथमला तंबूत पाठवले. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जडेजा 4 सामन्यात फक्त 4 विकेट घेऊ शकला, तर फायनल सामन्यापूर्वी 2 डावात फलंदाजी करताना त्याने फक्त 18 धावा केल्या.

हेही वाचा-

भारत विरुद्ध न्यूझीलंड, अंतिम सामना; न्यूझीलंडने दिले 252 धावांचे लक्ष्य
युझवेंद्र चहलची फायनलला हजेरी! पहा सोबत आलंय कोण?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---