सेंच्युरीयन | भारतीस संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका ५-१ अशी जिंकली. यात कर्णधार कोहलीने चमकार कामगिरी करत 6 सामन्यात ५५८ धावा केल्या.
काल पत्रकार परीषदेत जेव्हा विराटला याबद्दल विचारण्यात आले की तेव्हा त्याने सर्व मालिका सारख्याच असल्याच म्हटल आहे.
जेव्हा विराटला काल एक प्रश्न विचारण्यात आला की ‘भारताचा हा तुझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय आहे का?’ तर विराट म्हणाला,”हे तुम्ही चांगले सांगू शकता कारण एक महिन्यापुर्वी तर आम्ही खूप खराब संघ होतो. परंतू आता असे प्रश्न विचारले जावू लागले आहेत. आम्ही तेव्हाही आणि आताही आमची मानसिकता बदलली नाही.”
“आम्ही केवल क्रिकेटवर लक्ष दिले आहे आणि मोठा विजय आहे की नाही ह्या चर्चत आम्हाला रस नाही. आमचं काम क्रिकेट खेळणे आहे. आमचं काम कष्ट करण आहे. बाकी ज्यांना जे बोलयच आहे ते बोलू द्या. ” असेही तो पुढे म्हणाला.






