---Advertisement---

टीम इंडिया रिलॅक्स, डब्लिन शहरात घेतेयं सहलीचा आनंद

---Advertisement---

डब्लिन। भारतीय संघ आज, 29 जूनला आयर्लंड विरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवून 2 सामन्याच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या सामन्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहली संघसहकारी शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि केएल राहुलबरोबर डब्लिन शहरात फिरायला गेले होते. या खेळाडूंबरोबरच भारताच्या बाकी खेळाडूंनीही फिरण्यास पसंती दिली. त्याचे फोटो विराटने तसेच बाकी खेळाडूंनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

विराटने याआधीच हार्दिकला इंग्लंड दौऱ्यासाठी प्रवास करत असताना संघातल्या नवीन खेळांडूना इंग्लंड आणि आयर्लंडमधील ठिकाणे दाखवणार असल्याचे सांगितले होते.

भारतीय संघाने आयर्लंड-इंग्लंड दौऱ्याची सुरुवात शानदार केली असली तरी विराटची या दौऱ्याची सुरुवात हवी तशी झालेली नाही. तो पहिल्याच सामन्यात शून्य धावेवर बाद झाला.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर आणि कुलदिप यादवच्या 4 विकेट्सच्या जोरावर 76 धावांनी विजय मिळवला होता.

त्यामुळे भारतीय संघ आता दुसरा सामना जिंकून आयर्लंडला व्हाईटवॉश देण्यास उत्सुक असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

राहुल द्रविडचा हा सेल्फी पाहिलाय का? दोन दिग्गजांचा हा आहे ‘दिग्गज सेल्फी’

भारताविरुद्ध वनडेसाठी इंग्लंडचा संघ घोषीत, दोन दिग्गजांचा समावेश

जबरदस्त पुनरागमन केलेल्या स्टिव्ह स्मिथची अशी होती पहिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment