सेंच्युरीयन | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ६्व्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करताना अनेक विक्रम केले. याच सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान १७०००धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावे झाला.
अशाच काही विक्रमांचा हा लेखाजोखा-
-३५ वे वनडे शतक विराटने २००व्या डावात तर सचिनने ३०९व्या डावात केले होते. अन्य कोणत्याही खेळाडूला ३०च्यावर शतके करता आली नाहीत.
-द्निपक्षिय मालिकेत ५०० धावा करणारा पहिला खेळाडू. रोहित शर्माने (२०१३-२०१४) यापुर्वी ४९१ धावा केल्या होत्या.
-विराटने आज १७००० आंतरराष्ट्रीय धावा, वनडेत १०० झेल आणि वनडेत ९५०० धावांचा टप्पा पार केला.
-विराटने आज १७००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा केवळ ३६३ डावात पार केला. हशिम अमलाला ही कामगिरी करायला ३८१ डाव खेळावे लागले होते.
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ हजार, १६ हजार आणि १७ हजार धावांचा टप्पा विराटने सर्वात वेगाने पार केला आहे.
–वनडेत ९५०० धावांचा टप्पा विराटने केवळ २०० डावात पार केला अाहे. एबी डिव्हिलियर्सला यासाठी २१५ डाव लागले होते.
-भारताकडून केवळ सचिन तेंडूलकर, राहूल द्रविड, विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७००० धावा केल्या आहेत.
-विराटने या दौऱ्यावर तब्बल ८०० धावांचा टप्पा पार केला आहे.