---Advertisement---

विराटला आठवला पाकिस्तानविरुद्धचा सामना, इंस्टाग्रामवर खास फोटो पोस्ट करत दिली ‘ही’ रिऍक्शन

Virat-Kohli
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याला 23 ऑक्टोबर 2022ला पाकिस्तान विरुद्ध खेळलेला सामना आठवला आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला, जो भारताने विराटच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 4 विकेट्सने जिंकला होता. हा सामना त्याच्या हृद्याच्या किती जवळ आहे हे विराटने पोस्ट करत सांगितले.

भारताचा उजव्या हाताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत खेळला गेलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ’23 ऑक्टोबर 2022 माझ्यासाठी नेहमीच खास राहणार आहे. क्रिकेटमध्ये अशी ऊर्जा कधी जाणवली नाही. काय संध्याकाळ होती ती.’ त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले असून ती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/ClaK_uAvxv9/?utm_source=ig_web_copy_link

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली होती. पाकिस्तानने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावसंख्या उभारली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिल्या चार विकेट्स 31 धावसंख्येवरच गमावल्या होत्या. तेव्हा विराटने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. हा सामना जिंकत भारताने टी20 विश्वचषकाच्या प्रवासाला उत्तम सुरूवात केली होती. पुढेही चांगले होईल असे वाटत असताना भारत उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत झाला.

या स्पर्धेत पुन्हा एकदा विराटने धावांचा पाऊस पाडला. त्याने सर्वाधिक अशा 296 धावा केल्या. या धावा त्याने 6 डावांमध्ये 98.66च्या सरासरीने केल्या. ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश देखील आहे. तसेच त्याने या स्पर्धेच्या इतिहासात हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय आणि दुसरा क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा (1141) करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा गाठण्याचीही कामगिरी केली.

विराटने न्यूझीलंडच्या दौऱ्यातून विश्रांती घेतली असून तो आता थेट बांगलादेशच्या दौऱ्यात खेळणार आहे. ज्याची सुरूवात 4 डिसेंबरला वनडे सामन्याने होणार आहे. Virat Kohli instagram post about t20 world cup match vs Pakistan

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: टीम इंडिया पोहोचली हॅमिल्टनला, बसमधून उतरताच अर्शदीपने केला भांगडा; व्हिडिओ व्हायरल
अर्जेंटिनाला पराभूत केल्याने ‘राजा’ भलताच खूष! सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला रोल्स रॉयस ‘गिफ्ट’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---