मुंबई । आज भारतीय क्रिकेट संघाच्या ट्विटरवरून एक खास विडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि १९ वर्षाखालील संघाचा सलामीवीर शुभम गिल यांचा फटका मारतानाचा खास विडिओ शेअर केला आहे.
या विडिओमध्ये विराट कोहलीने इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना एक खास फटका मारला होता तोच आज शुभमने झिम्बाब्वेविरुद्ध असाच फटका मारला. त्याने आज झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना ५९ चेंडूत ९० धावा केल्या. त्यात त्याच्या १ षटकार आणि १३ चौकरांचा समावेश आहे.
शुभम गिल पंजाबकडून खेळताना २ सामन्यात ६१.२५च्या सरासरीने २४५ धावा केल्या आहेत. तसेच १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये १०० पेक्षा जास्त सरासरी असणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याने आजपर्यंत १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये १२ सामन्यात १०३.३३च्या सरासरीने ९३० धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या ३ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
Video:
SPECIAL: @imVkohli invents short-arm jab & Shubman Gill reproduces it at #U19CWC
Here's the comparison of the unique shot –https://t.co/0PsVpk1lvR pic.twitter.com/3QfzQIBTue— BCCI (@BCCI) January 19, 2018