आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. दोन वर्षे चाललेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली जाऊ लागली आहे. परंतु विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी वगळली तर, विराट कोहलीची कर्णधाराच्या रुपातील आकडेवारी थक्क करणारी आहे.
उत्कृष्ट कर्णधार आहे विराट
विराट कोहलीवर टीका करणाऱ्यांनी कदाचित त्याची आकडेवारी पाहिली नसावी. कारण गेल्या काही वर्षात त्याने भारतीय संघांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठमोठ्या मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. चला तर पाहूया विराट कोहलीने केलेले किर्तीमान. (Virat Kohli is best Indian test captain but still people trolling him after defeat against new zealand)
१) विराट कोहलीला आयसीसीने या दशकातील कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते.
२) विराट कोहली आशियामध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा कर्णधार आहे.
३) विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वाधिक कसोटी सामने जिंकले आहेत.
४) ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकून देणारा विराट कोहली पहिलाच कर्णधार आहे.
५) विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग ५ वर्षे कसोटी संघाच्या यादीत सर्वोच्च स्थानी राहिला आहे.
हे सर्व किर्तीमान पाहूनही विराट कोहलीला एकट्याला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील पराभवासाठी जबाबदार ठरवणे योग्य नाही. कारण विराट कोहली भारताच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे.
संघातील खेळाडू ठरले फ्लॉप
भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचे दिसून आले. कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला अवघ्या १७० धावा करण्यात यश आले होते. यामध्ये रिषभ पंतची ४१ धावांची खेळी वगळता, इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंड संघाला विजयासाठी १३९ धावांची आवश्यकता होती. या आव्हानाचा बचाव करताना भारतीय गोलंदाज देखील अपयशी ठरले होते. दुसऱ्या डावात आर अश्विनला २ गडी बाद करण्यात यश आले. तर संघातील मुख्य गोलंदाज एकही विकेट घेऊ शकले नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! ‘या’ टी२० लीगमध्ये युवराज, डिविलियर्स अन् गेल घालणार धुमाकूळ?
भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला
कडक! फलंदाजाने षटकार खेचण्यासाठी फिरवली बॅट अन् चेंडूने उडवली थेट दांडी