आयपीएल 2025 स्पर्धेत लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये बंगळुरू आणि हैदराबाद(RCB vs SRH) संघामध्ये शुक्रवारी सामना होणार आहे, ज्यामध्ये आरसीबीचे लक्ष असेल की टॉप-2 संघांमध्ये टिकून राहण्याचं. एका बाजूला हैदराबाद प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. तसेच आरसीबी टॉप- 2 मध्ये प्रवेश करण्याच्या खूप जवळ आहे. संघाने 17 गुणांसह आधीच क्वालिफाय केले आहे. जर त्यांना हैदराबाद विरुद्ध विजय मिळाला तर त्यांचं टॉप- 2 मध्ये स्थान निश्चित होईल.
ज्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. बंगळुरूच्या बाहेर आरसीबीचे प्रदर्शन शानदार राहिलेले आहे. संघाने या हंगामात सर्व सहा बाहेर सामने जिंकले आहेत.
भारतीय क्रिकेट दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) टी20 क्रिकेटमध्ये अजून एक इतिहास रचण्याच्या खूप जवळ पोहोचला आहे. आतापर्यंत आरसीबीसाठी आयपीएल आणि चॅम्पियन मिळून 8933 धावा केल्या आहेत. जर आज त्याने हैदराबाद विरुद्ध सामन्यात 67 धावा केल्या, तर तो टी20 इतिहासात कोणत्याही एका संघासाठी 9000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरेल.
ही संख्या विराट कडून आरसीबीसाठी असलेले प्रेम दर्शवते. खूप वर्षांपासून आरसीबीसाठी महत्त्वाचा खेळाडू आणि काही सामन्यांमध्ये स्वतःच्या कामगिरीने संघाला त्याने विजय मिळवून दिलेला आहे. आता त्याच्या नावावर आणखी एक विक्रम जोडला जाणार आहे, त्यामुळे चाहत्यांना या पारीची अपेक्षा आहे.






