---Advertisement---

Asia Cup । फायनलसाठी विराट खूपच उत्सुक! बांगलादेशविरुद्ध सामना सुरू असताना गेला प्रॅक्टिसला

Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारी (15 सप्टेंबर) लढत झाली. कोलंबोमध्ये हा सामना खेळला गेला असून विराट कोहली याला विश्रांती दिली गेली होती. पण तरीही विराट अनेकदा मैदानात खेळाडूंना पाणी पाजताना दिसला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची इनिंग संपल्यानंतर विराट फलंदाजीचा सरवा करण्यासाठी नेट्समध्ये जाताना दिसला.

आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर फोर फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेशमध्ये खेळला गेला. मात्र या सामन्यामुळे अंतिम सामन्यावर काहीच फरक पडणार नव्हता. कारण भारत आणि श्रीलंका संघ आधीच अंतिम सामन्यात आपली जागा पक्की करून बसले आहेत. शुक्रवारी (15 सप्टेंबर) विराट कोहली (Virat Kohli) याला बांगलादेशविरुद्ध संघ व्यस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले नाही. अंतिम सामन्याआधी त्याला विश्रांती मिळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला. पण माजी भारतीय कर्णधार विश्रांती घेण्याच्या मुडमध्ये नव्हता. भारत आणि बांगलादेश संघ मैदानात खेळत असताना विराटने आपला मोर्चा नेट्सकडे वळवला.

हातात बॅट आणि हेलमेट आणि पायांना पॅड लावून विराट नेट्सच्या दिशेने चालला होता. यादरम्यनचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर पाहायला मिळत आहेत. अनेकांच्या मते विराट श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी खूपच उत्सुक आहे. (Virat Kohli is out for practice during the innings break of IND vs BAN match)

तत्पूर्वी विरानटे या लाईव्ह सामन्यात वॉटरबॉयची भूमिकाही पार पाडली. मैदानात खेळाडूंना पाणी घेऊन जाताना विराटचा मजेशीर अंदाचही चाहत्यांना पाहायला मिळाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.

बांगलादेश – लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---