---Advertisement---

“कोहलीला गोलंदाजी द्या” अरूण जेटली स्टेडियमवर चाहत्यांची मागणी, पाहा VIDEO

On: गुरूवार, जानेवारी 30, 2025 4:42 PM
---Advertisement---

सध्या रणजी ट्राॅफीमध्ये (Ranji Trophy) दिल्ली विरूद्ध रेल्वे (Delhi vs Railways) संघात अरूण जेटली स्टेडियमवर सामना रंगला आहे. दरम्यान या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) देखील खेळताना दिसत आहे. तो दिल्लीच्या संघाचा भाग आहे. या सामन्याद्वारे, विराटने 12 वर्षांहून अधिक काळानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले. युवा प्रतिभावान खेळाडू आयुष बदोनीच्या (Ayush Badoni) नेतृत्वाखाली विराट खेळत आहे.

या सामन्यात दिल्लीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर कोहलीला क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर पाहून स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याला गोलंदाजी करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी ‘कोहलीला गोलंदाजी द्या’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli) यापूर्वी नोव्हेंबर 2012 मध्ये शेवटचा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामना खेळला होता. आता कोहली 12 वर्षांहून अधिक काळानंतर रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पदार्पणाच्या सामन्यातच ऑस्ट्रेलियन फलंदाजाची शतकी खेळी, श्रीलंका बॅकफूटवर
पाचव्या दोशी इंजिनिअर्स ट्राॅफी आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स संघाला विजेतेपद
महाराष्ट्राचा पदकाचा चौकार, मिहीर आम्बेची रूपेरी कामगिरी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---