यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये (ICC Champions Trophy 2025) अनेक नवे विक्रम बनले, तर अनेक जुने विक्रम मोडीत निघाले. दरम्यान या मेगा स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंड आणि भारत (New Zealand vs India) संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. हा सामना भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) वनडे कारकिर्दीमधील 300वा सामना आहे.
यासह, विराट कोहली 300 वनडे सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू बनला. या सामन्यात कोहलीच्या बॅटने चमकदार कामगिरी केली नसली, तरी त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. विराट वगळता जगातील कोणताही फलंदाज या स्थानावर पोहोचू शकलेला नाही.
विराटला मोठी खेळी खेळून त्याचा 300वा वनडे सामना खास बनवता आला नाही. त्याला मॅट हेन्रीने ग्लेन फिलिप्सच्या हातात झेलबाद केले. फिलिप्सने कोहलीचा अविश्वसनीय झेल टिपला. यादरम्यान विराटने 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या.
अनेक विश्वविक्रम करणाऱ्या विराटने वनडे क्रिकेटमध्ये 300 सामने खेळण्याचा विक्रम केला. या सामन्यासह त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. खरेतर, विराट हा जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे ज्याने 300 वनडे सामने, किमान 100 कसोटी आणि 100 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
एकूण 18 क्रिकेटपटूंनी आतापर्यंत आपापल्या देशांसाठी 300 वनडे सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी कोणीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतर दोन्ही फाॅरमॅटमध्ये प्रत्येकी 100 सामने खेळू शकलेले नाही.
300 वनडे सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी-
शाहिद आफ्रिदी – 398
इंझमाम-उल-हक – 378
रिकी पॉन्टिंग – 375
वसीम अक्रम – 356
एमएस धोनी – 350
मुथय्या मुरलीधरन – 350
राहुल द्रविड – 344
मोहम्मद अझरुद्दीन – 334
तिलकरत्ने दिलशान – 330
जॅक कॅलिस – 328
स्टीव्ह वॉ – 325
चामिंडा वास – 322
सौरव गांगुली – 311
अरविंद डी सिल्वा – 308
युवराज सिंग – 304
शॉन पोलॉक – 303
ख्रिस गेल – 301
विराट कोहली – 300*
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट कोहलीचा नवा विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी करून सचिन-धोनीच्या खास यादीत समावेश”
या खेळाडूसह पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा, सुवर्ण कामगिरी!
श्रेयस अय्यरच संथ अर्धशतक! न्यूझीलंडविरुद्ध तीन वर्षांचा जुना विक्रम मोडला






