-Sharad Bodage
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली जसे मैदानांवरील विक्रमांमुळे चर्चेत असतो, तसे मैदानाबाहेरही विविध गोष्टींमुळे चर्चेत येत असतो. विराट हा केवळ क्रिकेटपटूच नाही, तर एक बिझनेसमनदेखील आहे. त्याने त्याच्या स्वत:चा एक ब्रँडही सुरू केलेला आहे, इतकेच नाही, तर विराट एका इंस्टाग्राम पोस्टमधूनही करोडो रुपये कमावतो.
साल २०२१ वर्षातील हॉपर इंस्टाग्राम रिच नुसार एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक पैसे मिळवण्याच्या बाबतीत विराट दक्षिण आशियात अव्वल क्रमांकावर आहे. तसेच जगभरात १९ व्या क्रमांकावर आहे. तो एका पोस्टसाठी ६८०००० डॉलर (जवळपास ५ कोटी) रुपये घेतो.
हॉपर इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल क्रमांकावर आहे. तो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी १,६०४,००० डॉलर म्हणजेच जवळपास १२ कोटी रुपये घेतो. खेळाडूंमध्ये या यादीत रोनाल्डोनंतर अर्जेंटिनाचा लिओनल मेस्सीचा क्रमांक लागतो. मेस्सी एका इंस्टाग्राम पोस्टचे १,१६९,००० डॉलर (जवळपास ८.६८ कोटी) घेतो.
त्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा नेमार ज्यूनियर असून तो एका इंस्टाग्राम पोस्टचे ८२४,००० डॉलर (जवळपास ६.१२ कोटी रुपये) घेतो. त्यानंतर भारताच्या विराट कोहलीचा क्रमांक येतो.
इतकंच नाही तर विराट इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोवर्स असणारा आशिया खंडातील सेलिब्रेटी देखील आहे. ९ जानेवारी २०२१ पर्यंत विराटला १७८ मिलियन फॉलोवर्स आहेत. तो सर्वाधिक फॉलोवर्स लाभलेला जगभरातील तिसरा खेळाडू आहे. या यादीतही रोनाल्डो क्रमांक एकला असून त्याला ३८८ फॉलोवर्स आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर लिओनेल मेस्सी असून त्याचे २९८ फॉलोवर्स आहेत. त्यानंतर विराटचा क्रमांक लागतो. विराटला १७८ मिलियन फॉलोवर्स आहेत.
विराट सध्या भारतीय संघासह दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून ३ सामन्याची कसोटी मालिका खेळत आहे. कसोटी मालिकेनंतर लगेचच ३ सामन्यांची वनडे मालिकाही होणार आहे. या दोन्ही मालिकेत विराटचा भारतीय संघात समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: शेवटच्या कसोटीपूर्वी रॅास टेलर भावुक, राष्ट्रगीत सुरू असताना अश्रू अनावर
पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला
केपटाऊन कसोटीत भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ अविस्मरणीय कामगिरी, ज्या आजही विसरणे कठीण