ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून पुरूषांचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) खेळला जाणार आहे. यामध्ये भारताचा संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर 15 सदस्यांच्या यादीत केएल राहुल याला उपकर्णधार म्हणून निवडले आहे, तर विराट कोहली याचाही संघात समावेश आहे. त्याने युएई येथे झालेल्या आशिया चषक 2022च्या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले टी20 शतक झळकावले. तर विश्वचषकाआधी भारत घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. तर याच संघाविरुद्ध विराटच्या नावावर टी20मध्ये एक विलक्षण विक्रम आहे.
भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 500पेक्षा अधिक टी20 प्रकारातील धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर तो अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आतापर्यंत 19 सामन्यातील 18 डावांमध्ये फलंदाजी केली. यामध्ये 59.83च्या सरासरीने 718 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाबाद 90 ही त्याची सर्वोच्च टी20 धावसंख्या आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक टी20 धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये 35.61च्या सरासरीने 463 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याची सर्वोत्तम टी20 धावसंख्या 105 आहे.
या यादीत तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 420 धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानावर इंग्लंडचा जोस बटलर (Jos Buttler) आहे. त्याने 12 सामन्यांमध्ये 392 धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हा आहे. त्याने 8 सामन्यात 63.83च्या सरासरीने 384 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक टी20 धावा करणारे खेळाडू
718 – विराट कोहली (19 सामने)
463 – मार्टिन गप्टिल (13 सामने)
420 – ख्रिस गेल (14 सामने)
392 – जोस बटलर (12 सामने)
384 – बाबर आझम (8 सामने)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याला विरोधी संघ का घाबरतील?’, अर्शदीपविषयी पाकिस्तानी दिग्गजाचे मोठे वक्तव्य
अखेर पुजाराने उलगडले तुफानी फॉर्मचे रहस्य! म्हणाला, “त्यांना पाहून मी बदललो”
ना प्रॅक्टीस ना क्रिकेटच्या चर्चा, फक्त पत्नीसोबत…! सूर्याने सांगितले विस्फोटक फलंदाजीचे रहस्य






