दुबई। 6 आॅक्टोबरला दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील वनडे मालिका पार पडली. या मालिकेनंतर आयसीसीने सोमवारी वनडे क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम राहिले आहेत.
या क्रमवारीत फलंदाजांमध्ये विराट 884 गुणांसह अव्वल स्थानी तर रोहित शर्मा 842 गुणांसह रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी कायम आहे.
त्याचबरोबर फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहा फलंदाजांमध्ये शिखर धवन 802 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. या तिघांव्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज पहिल्या दहामध्ये नाही.
तसेच गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह 797 गुणांसह अव्वल स्थानी तर भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव 700 गुणांसह तिसऱ्या स्थानी कायम आहे. या क्रमवारीत अफगाणिस्तानचा रशीद खान 788 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
मात्र गोलंदाजांच्या या क्रमवारीत पहिल्या दहा गोलंदजांमध्ये बुमराह आणि कुलदीप व्यतिरिक्त अन्य भारतीय गोलंदाजांचा समावेश नाही. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल 11 व्या स्थानी आहे.
आयसीसीने जाहिर केलेल्या या क्रमवारीत भारत 122 गुणांसह दुसऱ्या स्थानी असून इंग्लंड 127 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या क्रमवारीत या महिन्यात बदल होण्याची शक्यता आहे.
कारण 10 आॅक्टोबर पासून श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यात वनडे मालिका होणार आहे. तसेच भारत विरुद्ध विंडिज यांच्यात 21 आॅक्टोबरपासून 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे.
त्यामुळे इंग्लंडचा संघ श्रीलंकाविरुद्ध विजय मिळवत अव्वल स्थान भक्कम करण्याचा तर भारत विंडिजवर वर्चस्व राखत अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. पण अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्या वनडे मालिकेतील निकालावर अवलंबुन रहावे लागेल.
त्याचबरोबर बांगलादेशलाही आठवे स्थान भक्कम करण्याची संधी आहे. त्यांची झिम्बाब्वे विरुद्ध 20 आॅक्टोबरपासून 3 वनडे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–PBL 2018: प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये भारतीय खेळाडू मालामाल
–आसीसीच्या त्या नियमाने कर्णधार विराट कोहली वैतागला
–दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटऐवजी या खेळाडूला मिळणार संधी?