---Advertisement---

गांगुली, सचिन नंतर किंग कोहली असा विक्रम करणारा केवळ तिसरा भारतीय

On: रविवार, जुलै 7, 2019 6:28 PM
---Advertisement---

लीड्स। शनिवारी(6 जूलै) 2019 विश्वचषकात 44 वा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. हेडिंग्ले स्टेडीयमवर झालेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. याबरोबरच या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने खास विक्रम केला आहे.

विराटने जेव्हा या सामन्यात 5 वी धाव घेतली त्यावेळी त्याने विश्वचषकात 1000 धावा पूर्ण केल्या. आत्तापर्यंत भारताकडून विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा फक्त सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीला पार करता आला आहे.

विश्वचषकात सचिनने 44 डावात 2278 धावा केल्या आहेत. या फक्त भारताकडूनच नाही तर विश्वचषकात एखाद्या खेळाडूने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

विराटने या सामन्यात 41 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या आता विश्वचषकात 25 डावात 49 च्या सरासरीने 1029 धावा झाल्या आहेत. त्यामुळे त्याने भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत गांगुलीच्या 1006 धावांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे.

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना अँजेलो मॅथ्यूजच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 7 बाद 264 धावा केल्या होत्या. मॅथ्यूजने 113 धावांची खेळी केली. तसेच लहिरु थिरिमन्नेने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 265 धावांचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने 103, केएल राहुलने 111 धावांची शतकी खेळी केली. त्यामुळे भारताने 43.3 षटकात 3 विकेट्स गमावत 265 धावांचे आव्हान सहज पार केले. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा, इसुरु उडाना आणि कसुन रजिथा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

2278 – सचिन तेंडुलकर, 44 डाव

1029 – विराट कोहली, 25 डाव

1006 – सौरव गांगुली, 21 डाव

977 – रोहित शर्मा, 16 डाव

860 – राहुल द्रविड, 21 डाव

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकात ११ वर्षांनंतर कोहली समोर पुन्हा विलियम्सनच्या न्यूझीलंडचे आव्हान; होणार खास योगायोग

…आणि अखेर धोनीचे गेल्या वाढदिवसाला अपुर्ण असलेले स्वप्न पुर्ण झाले

हॅप्पी बर्थडे माही…!!!

वाढदिवस विशेष- माही ढकल रहा है!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment