टी20 विश्वचषक 2022आधी भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे. रविवारी (25 सप्टेंबर) हैद्राबाद येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी केली. त्याने 48 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकाराच्या सहाय्याने 63धावा केेल्या आहेत. भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकला.
विराट कोहली (Virat Kohli) याने भारताच्या विजयामध्ये महत्वाची भुमिका पार पाडताना पुन्हा एकदा तोच चेज मास्टर आहे, हे सिद्ध केले आहे. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा आणि अर्धशतके करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने अशी कामगिरी 37 सामन्यांच्या 34 डावांमध्ये केली आहे. यामध्ये त्याने 90.35च्या सरासरीने 1536 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या या छोट्या प्रकारामध्ये त्याच्या बॅटमधून एकही शतक निघाले नाही, मात्र त्याने 15 अर्धशतके केली आहेत. यावेळी त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नाबाद 94 राहिली तर स्ट्राईक रेट 135.33 चा आहे.
विराट आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 41.20च्या सरासरीने 1195 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने 29.82च्या सरासरीने 1193 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना टी20मध्ये 1018 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल 902 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
आशिया चषक 2022च्या आधी विराट आऊट ऑफ फॉर्म होता. त्याने या स्पर्धेत भारताच्या शेवटच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी20तील पहिले शतक केले. त्याने अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद 122 धावा केल्या. यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याच्या फॉर्ममध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने 11 आणि 2 धावा अशी निराशाजनक खेळी केली, मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक केले आणि सूर्यकुमार यादव याच्यासह शतकी भागीदारीही केली.
https://twitter.com/BCCI/status/1574065888403521537?s=20&t=u-CpcksJoYCgYrj4LGyKYw
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे-
1536 – विराट कोहली (सरासरी 90.35)
1195 – डेविड वॉर्नर (सरासरी 41.20)
1193 – रोहित शर्मा (सरासरी 29.82)
1018 – बाबर आझम (सरासरी 48.47 )
902 – ग्लेन मॅक्सवेल (सरासरी 41.00)
महत्वाच्या बातम्या-