भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर बांग्लादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ज्यात त्यांनी पहिला सामना 280 धावांनी जिंकला होता. आता दोन्ही संघात मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ दुसरी कसोटी जिंकताच बांग्लादेशला मालिकेत क्लीन स्वीप करेल. सामन्यापर्वी आता भारतीय खेळाडूही कानपूरला पोहोचले आहेत. भारतीय संघ कानपूरला पोहोचल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि इतर खेळाडू मैदानात दिसले.
कानपूर कसोटीत विराट कोहलीकडून चाहत्यांना खूप अपेक्षा असतील. पण मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याची बॅट शांतच होती. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने 6 धावा आणि दुसऱ्या डावात 17 धावा केल्या होत्या. मात्र कानपूरमध्ये कोहलीची बॅट चालली तर तो एकाच वेळी अनेक विक्रम मोडीत काढू शकतो. चला तर या बातमीद्वारे या विक्रमांवर नजर टाकुयात.
कानपूर कसोटीत सचिन तेंडुलकर आणि सर डॉन बॅडमॅनचे काही विक्रम एकत्र मोडण्याची सुवर्णसंधी कोहलीला आहे. यामध्ये पहिले वळण फक्त सचिनचेच असू शकते. कानपूर कसोटीत कोहलीने 35 धावा केल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम करेल.
सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. ज्याने 623 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर कोहलीने आतापर्यंत 534 कसोटी सामन्यांच्या 593 डावांमध्ये 26965 धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला बराच वेळ असला तरी तो कानपूरमध्येच करायला आवडेल.
कोहलीने कानपूर कसोटीत शतक ठोकल्यास तो ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज सर डॉन बॅडमनला मागे टाकेल. वास्तविक, सध्या कोहली 29 शतकांसह ब्रॅडमनच्या बरोबरीने आहे. कारकिर्दीतील 30 वे कसोटी शतक झळकावताच कोहली या बाबतीत मॅथ्यू हेडन आणि शिवनारायण चंद्रपॉलच्या बरोबरीने उतरेल.
कानपूर कसोटीत कोहलीची बॅट चमकली आणि त्याने दोन्ही डावांत मिळून 129 धावा केल्या तर तो आणखी एक मोठी कामगिरी करेल. कोहली त्याच्या 9 हजार कसोटी धावा पूर्ण करेल आणि सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर चौथा भारतीय असेल. तर तो जागतिक क्रिकेटमधील 17वा फलंदाज ठरेल.
चौकारांच्या बाबतीतही कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. कोहलीच्या नावावर सध्या 114 कसोटींमध्ये 993 चौकार आहेत. त्याने आणखी 7 चौकार मारले तर त्याच्या कसोटी कारकिर्दीत 1000 चौकार होतील. अशा प्रकारे तो 1000 चौकार मारणाऱ्यांच्या क्लबमध्येही सामील होईल.
याशिवाय विराट कोहलीला क्षेत्ररक्षणात झेल घेण्याचाही मोठा विक्रम करण्याची संधी आहे. सध्या कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 113 झेल घेतले आहेत. आता कानपूर कसोटीत त्याने आणखी 2 झेल घेतल्यास तो सचिन तेंडुलकरला मागे टाकेल. सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत कोहली राहुल द्रविड (210 झेल) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (135 झेल) यांच्यानंतर तिसरा भारतीय ठरेल.
हेही वाचा-
IND vs BAN: कानपूरमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित? क्युरेटरने खेळपट्टीबाबत केला मोठा खुलासा
“आम्ही डगआउटमध्ये…”, धोनीच्या अंपायरशी झालेल्या वादावर मोहित शर्माने तोडले मौन
मनू भाकरचा ट्रोलर्संना चोख प्रत्युत्तर; म्हणाली “हा माझा सुंदर….”, या कारणामुळे झाली होती ट्रोल