जेव्हा क्रिकेट-फुटबॉलमधील दोन दिग्गज भेटतात एकमेंकांना…

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून 2019 विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असून आज(25 मे) भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सराव सामना रंगणार आहे.

पण या सामन्याआधी इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरि केनने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची भेट घेतली आहे. या दोघांचा फोटो केनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्याचबरोबर त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की ‘मागील काही वर्षांतील अनेक ट्विट्सनंतर अखेर विराटला भेटलो. तो चांगला व्यक्ती असून शानदार खेळाडू आहे.’

यानंतर हाच फोटो विराटनेही शेअर करत म्हटले आहे की ‘तूला भेटून आनंद झाला. तूला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा.’

टोटेनहॅम हॉटस्पर क्लबचा खेळाडू असणारा केन हा यूईफए चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूल विरुद्ध 1 जूनला खेळण्यासाठी तयारी करत आहे. सध्या तो दुखापतीतून सावरत असून या अंतिम सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

याआधीही विराट आणि केन यांनी एकमेकांशी ट्विटरवरुन संवाद साधला आहे. मागीलवर्षी रशियामध्ये पार पडलेल्या फिफा विश्वचषकादरम्यान विराटने केनला शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. यावर केननेही त्याला उत्तर देताना आभार मानले होते. या फिफा विश्वचषकात केन हा गोल्डन बुटचा मानकरीही ठरला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडच्या माजी कर्णधाराला अजूनही वाटते या दोन भारतीय क्रिकेटपटूंची भीती…

विश्वचषक २०१९: टीम इंडियाला धक्का; हा महत्त्वाचा खेळाडू झाला दुखापग्रस्त

या १० दिग्गज क्रिकेटपटूंना आजपर्यंत मिळवता आले नाही विश्वचषकाचे विजेतेपद

You might also like

Leave A Reply