---Advertisement---

सिक्सर किंग युवराजलाच नाही तर हिटमॅन रोहितलाही सरस ठरलाय विराट कोहली!

On: गुरूवार, डिसेंबर 12, 2019 12:58 PM
---Advertisement---

मुंबई। भारताने बुधवारी(11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 67 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर 3 सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिका विजयात कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) मोलाचा वाटा उचलला.

याबरोबरच विराटने या मालिकेत 3 सामन्यात एकूण 183 धावा केल्या आहेत. यात त्याच्या कालच्या सामन्यातील 29 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह केलेल्या नाबाद 70 धावांची खेळीचा तसेच हैद्राबाद येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात 6 चौकार आणि 6 षटकारांसह केलेल्या नाबाद 94 धावांच्या खेळीचाही समावेश आहे.

विराटने या संपूर्ण मालिकेत एकूण 13 षटकार मारले. त्यामुळे तो भारतासाठी एका टी20 मालिकेत किंवा स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी हा विक्रम भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या नावावर होता. युवराजने 2007 च्या टी20 विश्वचषकात खेळताना 6 सामन्यात 12 षटकार मारले होते.

#भारतासाठी एका टी20 मालिकेत / स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

13 षटकार – विराट कोहली (विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019)

12 षटकार – युवराज सिंग (2007 विश्वचषक)

11 षटकार – रोहित शर्मा (विरुद्ध श्रीलंका, 2017)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---