आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. यंदा, बंगळुरूचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे, तर कोलकाताने या हंगामासाठी रहाणेला संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली मोठी कामगिरी करू शकतो. तो केकेआरविरुद्ध हजाराहून अधिक धावा करणारा तिसरा खेळाडू बनण्याच्या अगदी जवळ आहे.
विराट कोहलीच्या आधी रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीकडे सुरेश रैनाचा विक्रम मोडण्याची संधी आहे. ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्यात विराट कोहली पाच धावा करताच रैनाला मागे टाकेल.
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने 28 सामन्यांमध्ये 1093 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने 34 सामन्यांमध्ये 1070 धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने 28 सामन्यांमध्ये 966 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 35 सामन्यांमध्ये 962 धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या इतिहासात, कोहलीशिवाय इतर कोणत्याही खेळाडूने दोन किंवा अधिक विरोधी संघांविरुद्ध 1000 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. कोहलीने दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज विरुद्ध एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तो चौथ्या संघाविरुद्ध हा पराक्रम करण्याच्या अगदी जवळ आहे.
डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्ज आणि नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएलमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर, रोहितने केकेआर आणि किंग्जविरुद्ध ही कामगिरी केली आहे. कोहली 252 सामन्यांमध्ये 8004 धावांसह आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध सर्वाधिक धावा
डेव्हिड वॉर्नर – 28 सामन्यात 1093 धावा
रोहित शर्मा – 34 सामन्यांमध्ये 1070 धावा
सुरेश रैना – 28 सामन्यात 966 धावा
विराट कोहली – 35 सामन्यात 962 धावा