fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कर्णधार कोहली आणि नाणेफेकीच नातं जगावेगळं

मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील १५० वा विजय ठरला आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराटने या सामन्यात नाणेफेक जिंकली होती. त्यामुळे कोहलीच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे. कोहली आत्तापर्यंत कधीही नाणेफेक जिंकल्यानंतर सामना पराभूत झालेला नाही.

त्याने आत्तापर्यंत ४५ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील २१ सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली आहे. या २१ सामन्यांपैकी १८ सामन्यात भारताने विजय मिळवला असून ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.

यामुळे कोहली हा नाणेफेक जिंकल्यानंतर पराभव न स्विकारता सर्वाधिक सामने खेळणारा कर्णधार ठरला आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर पराभव न स्विकारता सर्वाधिक सामने खेळणारे कर्णधार – 

२१ – विराट कोहली (१८ विजय, ३ अनिर्णित)

१० – डॉन ब्रॅडमन (९ विजय, १ अनिर्णित)

९ – फँक वॉरेल (६ विजय, १ बरोबरी, २ अनिर्णित)

९ – शॉन पोलॉक (७ विजय, २ अनिर्णित)

महत्त्वाच्या बातम्या:

भारताचा १५०वा कसोटी विजय, या देशाला पाजले सर्वाधिक वेळा पाणी

टीम इंडियाची कसोटी मालिकेत सरशी, ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभवाचा धक्का

जेव्हा तूला कॅंटीन सुरु कराव लागले तेव्हा मयांक काॅफी प्यायला येईल- शास्त्री

You might also like